Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

कारण सांगताच घरचेही अवाक


नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते गुरुचरण सिंग गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या वडिलांनी याबाबत दिल्ली पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासकार्य सुरु केले. सीसीटीव्ही फुटेज, गुरुचरण यांच्या मोबाईलचे लोकेशन अशा अनेक गोष्टींमार्फत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी 'तारक मेहता का अलटा चष्मा'च्या सेटवर जाऊन सर्व कलाकारांचीही चौकशी केली. मात्र, त्यांचे वेतन थकवले असल्याचीही कोणती समस्या नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते. मात्र, आज अचानक तब्बल २५ दिवसांनंतर बेपत्ता गुरुचरण सिंग आपल्या घरी परतले आहेत. त्यांनी बेपत्ता झाल्याचे कारण सांगितल्यानंतर घरचेही अवाक झाले आहेत.


गुरुचरण सिंग घरी परतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. पोलिसांना त्यांनी सांगितलं की, "मी संसारिक जीवन सोडून धार्मिक प्रवासाला निघालो होतो. दरम्यान, मी अमृतसर, नंतर लुधियाना आणि इतर अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये बरेच दिवस राहिलो. तेव्हा मला वाटलं की आपण घरी परतावे. त्यामुळे मी घरी परतलो."


२२ एप्रिल रोजी गुरुचरण सिंग घरातून निघाला होते. मात्र ते बेपत्ता झाल्याची बातमी २६ एप्रिल रोजी समोर आली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण २४ एप्रिलपर्यंत दिल्लीत जाणार होते. यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला.



'तारक मेहता का उल्टा चष्मा' मुळे मिळाली लोकप्रियता


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील रोशन सिंग सोढी या भूमिकेमुळे ​​गुरुचरण सिंग यांना विशेष लोकप्रियता मिळाली. २००८-२०१३ पर्यंत ते या शोचा भाग होते. यानंतर त्यांनी शोचा निरोप घेतला. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना शोमध्ये परत बोलावण्यात आले. पण २०२० मध्ये गुरुचरण यांनी पुन्हा वडिलांची काळजी घेण्यासाठी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोडला होता, असं म्हटलं जातं.

Comments
Add Comment

Independence Day 2026 : 15 ऑगस्टच्या तयारीला वेग; पंतप्रधान मोदींचे ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई : भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर आला असून देशभरात त्याची तयारी सुरू झाली आहे. याच

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे