Eknath Shinde : हिंदूत्व सोडले आता भगव्या झेंड्याची अ‍ॅलर्जी कारण तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर जोरदार टिका


यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा


मुंबई : बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी हिंदूत्व सोडले. आता तर त्यांना शिवरायांचा भगवा झेंडा, प्रभू रामचंद्राचा भगवा आणि वारकऱ्यांच्या भगव्या झेंड्याची अ‍ॅलर्जी झालीय कारण तुमच्या प्रचार रॅलींमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उबाठावर केली.


दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यभरात पहिल्या चार टप्प्यात महायुतीला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.



आपले सरकार येण्यापूर्वी सगळी कामे बंद होती. मेट्रो कारशेड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबईचे सौंदर्यीकरण असे अनेक प्रकल्प महायुतीने सुरु केले. दोन अडीच वर्षात मुंबईतील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वी रस्त्यावर केवळ डांबर टाकायचे आणि त्यात पैसे खायचे. यासाठी महापालिकेचे दहा वर्षात साडेतीन हजार कोटी रुपये खर्च झाले होते. पुढील २५ - ३० वर्षात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.


रखडलेले प्रकल्प, कोणामुळे अडकलेले प्रकल्प मार्गी लावून मुंबईबाहेर फेकलेल्या मुंबईकरांना हे सरकार परत आणणार आहे. त्यासाठी बीडीडी प्रकल्प, पोलिसांची घरे म्हाडा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमआयडीसीच्या माध्यमातून पुनर्विकासाचे प्रकल्प सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईसाठी इतके वर्ष काय केले, याचा हिशेब मुंबईकर येत्या निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. ज्या उपक्रमातून मुंबईकरांना लाभ होत असेल तर हा मुख्यमंत्री ते करायला तयार आहे, असे ते म्हणाले. पुनर्विकास रखडलेल्या ३८८ इमारतींसाठी नगर विकास विभागाला वेगळा नियम करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.


ही निवडणूक देश घडवणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला जगभरात मानसन्मान मिळवून दिला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. यासाठी यामिनी जाधव यांना निवडून द्यायचे आहे. आपल्या सरकारमध्ये भेदभाव नाही. हिंदू असो वा देशभक्त मुसलमान सर्वांना समान वागणूक दिली जाते. मात्र उबाठाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतात. त्यांच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटीतील आरोपी इक्बाल मुसा फिरतो. याकूब मेनन यांच्या कबरीचे उदात्तीकरण होतेय. मुंबई हल्ल्यातील शहिद पोलीसांचा अपमान केला, अशा ढोंगी लोकांना निवडणुकीत जागा दाखवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Comments
Add Comment

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री