Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकबोलघेवड्या अनिल देशमुखांना जयंत पाटलांनी उताणी पाडले!

बोलघेवड्या अनिल देशमुखांना जयंत पाटलांनी उताणी पाडले!

शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेल्याचा केला होता अनिल देशमुखांनी खळबळजनक दावा

नाशिक : दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. याच दरम्यान शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) येऊन गेल्याचा खळबळजनक दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला होता. मात्र अनिल देशमुख यांचा हा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चक्क फेटाळून लावल्याने बोलघेवडे अनिल देशमुख सपशेल उताणी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

त्याचे झाले असे की, काल (दि. १६) मनमाड येथील सभा आटोपून शरद पवार आणि जयंत पाटील हे नाशिकच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी दाखल झाले. यानंतर शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलला सुनील तटकरे यांनी भेट दिल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. पुढे ते म्हणाले की, अजित पवार नाराज आहेत. तसेच चार जूननंतर महायुतीतील अनेक नेते नाराज असतील. मात्र जे पक्षाला सोडून गेले त्यांना परत घ्यायचे नाही हे पवार साहेबांनी सांगितले आहे, असे त्यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, हॉटेलला सुनील तटकरे येऊन गेले, असे मला कळले. माझी भेट झाली नाही. मात्र आमचे काही कार्यकर्ते त्यांना भेटले, असा दावा देखील त्यांनी केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

परंतु, अनिल देशमुख यांचा हा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र सपशेल फेटाळून लावला. जयंत पाटील यांनी सांगितले की, मी आणि शरद पवार एकाच हॉटेलला नाशिकमध्ये मुक्कामाला होतो. तिथे तटकरे यांची भेट झाली नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. यामुळे प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करणा-या अनिल देशमुखांचे पितळ त्यांच्याच वरिष्ठांकडून उघडे पडल्याने राजकीय वर्तुळात आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -