PM Narendra Modi : मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय! पंतप्रधानांच्या रोड-शो बाबतीत 'या' विशेष सूचना जारी

१७ मे च्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू


मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना निवडणुकीचे रिंगण चांगलेच तापलेले दिसत आहे. सध्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रकिया होणार आहे. यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून सर्वंच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक, कल्याणमधील सभेनंतर मुंबईतील घाटकोपर येथे नरेंद्र मोदींचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे.


नरेंद्र मोदींच्या मुंबईतील या 'रोड शो'बाबत मुंबई पोलिसांकडून विशेष सूचना जारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुंबईत होणारी रॅली तर १७ मे रोजी मुंबईत शिवतीर्थावर होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडक आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश आज पासून १७ मे च्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात येणार आहेत.



पोलिसांकडून दिले 'हे' आदेश


विक्रोळी, कांजुरमार्ग, पार्कसाईट, घाटकोपर, पंतनगर, टिळकनगर, चेंबूर, चुनाभट्टी, बीकेसी, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, सहार, विमानतळ वाकोला, वांद्रे, वरळी दादर आणि शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आणि रिमोर्ट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर बंदी असणार आहे.



पाण्याची बॉटल, झेंडे, माचिस नेण्यास मनाई-


नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपरमध्ये रोड शो होत आहे. यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. संपूर्ण मार्ग बॅरीकेटिंग केलेली असली तरी अनेक ठिकाणी रहिवासी वस्ती आणि रेल्वे स्थानकाला जोडणारे मार्ग आहेत. या मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना बॅग, पाण्याची बॉटल, झेंडे, माचिस, लायटर, नेलकटर , टोकदार, धारधार वस्तू , कॅमेरे नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या बाबतचे फलक मुंबई पोलीस या मार्गावर ठिकठिकाणी लावत आहेत.



मुंबईतील पुढील मार्गात बदल-



  • अंधेरी घाटकोपर मार्ग वरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर व दक्षिण वाहिनीवरील वाहतूक

  • गोळीबार मैदान व घाटकोपर मेट्रो असताना जंक्शन येणारी वाहतूक

  • हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स येथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन कडे येणारी वाहतूक


असा असेल मोदींचा रोड शो


सायंकाळी ६:३० वाजता पंतप्रधान विक्रोळी येथे हजर होणार आहेत. रोड शो हा ६:४५ मिनिटांनी सुरू होऊन तो ७:४५ वाजता संपणार आहे. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्क्वेअर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल.



नरेंद्र मोदींचा घाटकोपर- मुलुंड दौरा-


नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या दौऱ्यात घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार आहेत. या ठिकाणी विद्यमान खासदार मनोज कोटक यांना तिकिट नाकारून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. मिहिर कोटेचा यांची ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याशी कडवी लढत होणार आहे. त्यामुळे या रोड शोचा फायदा मिहिर कोटेचा यांना होऊ शकतो.

Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला