Weather Update : पुढच्या ४८ तासांत 'या' जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी!

नागरिकांना हवामान खात्याचा सावधानतेचा इशारा


मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे राज्यात उष्णतेचा जोर ओसरला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच हवामान खात्याने (Meteorological Department) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.


मुंबई हवामान खात्याने आज आणि उद्याच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.



बुधवारचा हवामानाचा अंदाज


उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, बीड, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यातल्या तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत