Kartiki Gaikwad : लिटिल चॅम्प कार्तिकी झाली आई! बाळाची झलक दाखवत शेअर केली गुडन्यूज

कार्तिकी-रोनितच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन


मुंबई : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Little Champs) या रिअ‍ॅलिटी शोमधून (Reality show) घराघरांत पोहोचलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad). या शोचे विजेतेपद पटकावत कार्तिकीने आपली नवी ओळख तयार केली. आज इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्रात या लिटिल चॅम्प्सची क्रेझ कायम आहे. नुकतीच कार्तिकीने आपल्या चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे. कार्तिकी-रोनितच्या घरी इवलुशा पावलांनी छोटा पाहुणा आला आहे. कार्तिकी आणि रोनित आई-बाबा झाले असून त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.


दोन महिन्यांपूर्वी कार्तिकीच्या डोहाळ जेवणाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर कार्तिकीने आपण गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. कार्तिकी आई कधी होणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. अखेर आज कार्तिकीने आपण आई झाल्याची बातमी चाहत्यांनी दिली. कार्तिकीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत म्हटले की, आम्ही आमच्या राजकुमाराचे स्वागत करत आहोत. आम्हाला नवीन प्रेम सापडले असून हा क्षण खरंच व्यक्त करता येत नाही अशी भावना कार्तिकीने व्यक्त केली.



कार्तिकीने २०२० मध्ये रोनित पिसेसोबत (Ronit Pise) लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर चार वर्षांनी कार्तिकी-रोनित आईबाबा झाले आहेत. कार्तिकीच्या खास डोहाळे जेवणाचा कार्यक्रम देखील चर्चेचा विषय ठरला होता. पारंपरिक पद्धतीने कार्तिकीचं डोहाळे जेवण करण्यात आलं. डोहाळे जेवणासाठी कार्तिकीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती, तर रोहित शेरवानीमध्ये दिसला. कार्तिकीने या खास सोहळ्यासाठी खास पारंपरिक दागिने घातले होते.


Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन