Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीKartiki Gaikwad : लिटिल चॅम्प कार्तिकी झाली आई! बाळाची झलक दाखवत शेअर...

Kartiki Gaikwad : लिटिल चॅम्प कार्तिकी झाली आई! बाळाची झलक दाखवत शेअर केली गुडन्यूज

कार्तिकी-रोनितच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन

मुंबई : ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ (Sa Re Ga Ma Pa Little Champs) या रिअ‍ॅलिटी शोमधून (Reality show) घराघरांत पोहोचलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad). या शोचे विजेतेपद पटकावत कार्तिकीने आपली नवी ओळख तयार केली. आज इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्रात या लिटिल चॅम्प्सची क्रेझ कायम आहे. नुकतीच कार्तिकीने आपल्या चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे. कार्तिकी-रोनितच्या घरी इवलुशा पावलांनी छोटा पाहुणा आला आहे. कार्तिकी आणि रोनित आई-बाबा झाले असून त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वी कार्तिकीच्या डोहाळ जेवणाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर कार्तिकीने आपण गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. कार्तिकी आई कधी होणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. अखेर आज कार्तिकीने आपण आई झाल्याची बातमी चाहत्यांनी दिली. कार्तिकीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत म्हटले की, आम्ही आमच्या राजकुमाराचे स्वागत करत आहोत. आम्हाला नवीन प्रेम सापडले असून हा क्षण खरंच व्यक्त करता येत नाही अशी भावना कार्तिकीने व्यक्त केली.

कार्तिकीने २०२० मध्ये रोनित पिसेसोबत (Ronit Pise) लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर चार वर्षांनी कार्तिकी-रोनित आईबाबा झाले आहेत. कार्तिकीच्या खास डोहाळे जेवणाचा कार्यक्रम देखील चर्चेचा विषय ठरला होता. पारंपरिक पद्धतीने कार्तिकीचं डोहाळे जेवण करण्यात आलं. डोहाळे जेवणासाठी कार्तिकीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती, तर रोहित शेरवानीमध्ये दिसला. कार्तिकीने या खास सोहळ्यासाठी खास पारंपरिक दागिने घातले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -