MP News : काँग्रेस नकारात्मक राजकारण आणि लोकशाहीवर हल्ला करत आहे!

  33

इंदौरमधील 'त्या' प्रकारावर भाजपा प्रवक्ते अलोक दुबे यांची टीका


इंदौर : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या धामधुमीतच अनेक नेत्यांची पक्षांतरेही होत आहेत. इंदौरमधील (Indore lok sabha 2024) काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बाम (Akshay Kanti Bam) यांनी देखील शेवटच्या क्षणी काँग्रेसला धक्का दिला. त्यांनी उमेदवारी मागे घेतली आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे इंदौरमध्ये भाजपाची लढाई सोपी झाली आहे. मात्र, यानंतर आता काँग्रेसकडे उमेदवार न राहिल्यामुळे ते इंदौरमध्ये 'नोटा'ला (NOTA) मत द्या, असा प्रचार करत आहेत. यावर भाजपा प्रवक्ते आलोक दुबे (Alok Dubey) यांनी जोरदार टीका केली.


इंदौर लोकसभा मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने एकप्रकारे 'नोटा'साठी प्रचार सुरु केला आहे. ठिकठिकाणी छोटी आंदोलनं, बैठका, कँडल मार्च आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी नोटाला मतदान करावं यासाठी काँग्रेसने जोर लावला आहे. तर दुसरीकडे, इंदौरमध्ये भाजपसमोर कोणाचे आव्हान नाही. भाजपचे विद्यमान खासदार आणि यावेळीही तिकीट मिळालेले शंकर ललवानी यांच्याविरोधात १३ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. असे असले तरी इंदौरमध्ये निवडणूक एकतर्फीच होण्याची दाट शक्यता आहे. पण, काँग्रेसने निषेध म्हणून लोकांना नोटाला मत देण्याचे आवाहन केले आहे.


या पार्श्भूमीवर भाजपचे प्रवक्ते अलोक दुबे म्हणाले की, ''भाजपचा विजय होईल यात कसलीच शंका नाही.पण, काँग्रेस नोटाला समर्थन देऊन नकारात्मक राजकारण करत आहे. लोकशाहीवरील हा हल्ला आहे'', अशी टीका त्यांनी केली आहे.

Comments
Add Comment

२६/११ हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ!

नवी दिल्ली: मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ

मोठी बातमी : राजस्थानच्या चुरुमध्ये वायूसेनेचं विमान कोसळलं; २ मृतदेह आढळल्याची माहिती

चुरु (राजस्थान) : राजस्थानच्या चुरुमधील रतनगढ भागातील भानुदा गावात आज भारतीय हवाई दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त

राजस्थानमध्ये हवाई दलाचे जग्वार विमान कोसळले, वैमानिकांचा मृत्यू

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या

गुजरातमध्ये पूल कोसळला; ३ मृत्यू, अनेकजण बेपत्ता

नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली अहमदाबाद

टेक वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा धक्कातंत्र! जॅक डोर्सीचं 'बिटचॅट' अ‍ॅप लॉन्च; इंटरनेट, नेटवर्कशिवाय मेसेजिंग शक्य

मुंबई : ट्विटर आणि ब्लॉकचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एक क्रांतिकारी 'बिटचॅट' अ‍ॅप आणले आहे . या अ‍ॅपची खास गोष्ट

Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, शाळा, बँका... काय काय बंद राहणार?

२५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार नवी दिल्ली : बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील अंदाजे