हैदराबाद : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात आचारसंहिता (Code of conduct) लागू झाल्याने निवडणूक आयोग (Election Commission) राजकीय नेते व राजकीय पक्षांच्या प्रत्येक हालचालीवर व वक्तव्यावर बारीक नजर ठेवून आहे. आचारसंहितेचा भंग होत नसल्याची दखल आयोगाकडून घेतली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस अन् आयकर विभागाची नजर कायम आहे. मात्र, तरीही दर निवडणुकीप्रमाणे यावेळेसही मोठ्या प्रमाणात अवैध रक्कम आढळून आली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश यानंतर आंध्रप्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणात रोकड (Andhra Pradesh cash seized) आढळली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोन दिवसांत रोकड सापडल्याच्या दोन घटना या ठिकाणी घडल्या आहेत.
आंध्रप्रदेशच्या अनंतपल्ली येथे सात खोक्यांमध्ये पोलिसांना तब्बल सात कोटी रक्कम आढळली. मिळालेल्या माहितीनुसार, नल्लाजरला मंडलातील अनंतपल्ली येथे एका लॉरीला धडक दिल्याने वाहन पलटी झाले. त्या वाहनात रोकड असलेले ७ कार्डबोर्डचे बॉक्स नेले जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हे सातही बॉक्स जप्त केले. सध्या ही रक्कम निवडणूक अधिकार्यांकडे सोपवण्यात आली आहे.
हे वाहन विजयवाडाहून विशाखापट्टणमच्या दिशेने जात होते. पलटी झालेल्या वाहनाचा चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोपालपुरम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात पुन्हा एकदा मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे.
९ मे रोजी आंध्रप्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यातील गरिकापाडू चेकपोस्टवर एनटीआर जिल्हा पोलिसांनी ८ कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. ही रक्कम एका वेगळ्या केबिनमध्ये पाईपने भरलेल्या लॉरीमध्ये सापडली व या प्रकरणी दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. हे पैसे हैदराबादहून गुंटूरला नेले जात होते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…