नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४च्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार जोरात सुरू आहे. देशभरात सोमवारी म्हणजेच १३ मेला १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९६ लोकसभा मतदानसंघात मतदान होत आहे. यासाठी सर्वच पक्ष तसेच पक्षांचे नेते जोरदार प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या आज देशभरात सभा असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक २०२४साठी भाजपच्या अभियानांतर्गत सार्वजनिक सभा घेणार आहेत.तेलंगणाच्या नारायणपेट आणि एलबी स्टेडियमचा ते यावेळी दौरा करतील. ते १० मेला भुवनेश्वरमध्ये रोड शो करण्यासाठी ओडिशाला जातील. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा लोकसभा निवडणूक २०२४साठी शुक्रवारी हरयाणाच्या पंचकुलामध्ये रोडशो करतील.
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी १० मेला तेलंगणाच्या कामारेड्डी आणि तंदूरमध्ये सभांना संबोधित करतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही सीताराम येचुरी यांच्यासह १० मेला आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये गांधीनगरच्या जिमखाना मैदानात जनसभा घेतील. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज उत्तर प्रदेशातील कन्नौज आणि कानपूरमध्ये सभा घेतील.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १० मेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतील. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १० मेला सारसबाग येथे सार्वजनिक सभेला संबोधित करतील.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…