Sangli Loksabha : सांगलीत मतदान केंद्रावर घडला 'हा' वादग्रस्त प्रकार

पोलीस आणि मतदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?


सांगली : देशभरात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. काही ठिकाणचे किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडली. मात्र सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदान केंद्रावर एक अजब प्रकार उघडकीस झाला आहे. सांगलीत लोकसभा मतदानावेळी बनावट मतदान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.


निवडणुकीच्या मतदानादिवशी सांगली शहरातील मालू हायस्कूलमध्ये मतदानासाठी आलेल्या चार महिलांच्या नावे खोटे मतदान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. हा प्रकार निदर्शनास येताच मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला असून या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.



सांगली मतदान केंद्रावर नेमकं घडलं काय?


मतदानासाठी चार महिला मतदान करण्यासाठी मालू हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आल्या होत्या. परंतु, यावेळी त्यांच्या नावावर यापूर्वीच मतदान झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र संबंधित महिलांनी आम्ही मतदान केलंच नाही, तर कोणी आमच्या नावावर मतदान केलं? असा जाब विचारला. त्यावर, तुमच्या नावाचे मतदान झालं असून तुम्हाला आता मतदान करता येणार नाही असं केंद्राध्यक्षांनी सांगितल्यानंतर संबंधित महिलांनी गोंधळ घातला. मतदानावर ठाम असलेल्या महिलांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापटीचा प्रकार घडला. आता याबाबत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्रात ६ महिन्यांत ७८१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; केंद्र सरकारच्या अहवालाने गंभीर वास्तव उघड!

नागपूर : महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रातील गंभीर समस्या पुन्हा एकदा विधिमंडळात उघड झाली आहे. राज्यात गेल्या सहा

निर्ढावलेपणाला आळा घालणार!" बोगस जात प्रमाणपत्र घोटाळ्यावर मंत्री संजय शिरसाट यांची सभागृहात कठोर भूमिका

नागपूर : बुलढाणा जिल्ह्यातील बोगस जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणावरून आज (गुरुवारी) विधान परिषदेत सत्ताधारी आणि

वाहतूक पोलिसांना ‘बॉडी कॅमेरे’ लावणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा १००-२०० घेऊन गाड्या सोडणारे ट्रॅफिक पोलीस रडारवर नागपूर : ई-चलन फाडताना

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.