Rajasthan Accident : भीषण अपघात! भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच घरातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

ट्रकचालक फरार; सीसीटीव्हीत कैद झाला थरार


जयपूर : राजस्थानमध्ये हायवेवर एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर ट्रक आणि कारची जोरदार धडक लागली असून या अपघातात एकाच घरातील ६ जण ठार झाले. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला.


हे कुटुंब सीकर जिल्ह्यातून रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेश मंदिराकडे जाण्यासाठी निघालं होतं. हायवेवर कार मागून वेगाने येत असताना समोरुन जाणाऱ्या ट्रकने यु-टर्न घेतला. यानंतर कार थेट जाऊन ट्रकवर आदळली असल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. मात्र ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजस्थानमध्ये झालेल्या या अपघातामुळे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि उपमुख्यमंत्री दिव्या कुमारी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.


"दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर सवाई माधोपूर जिल्ह्यातील बाउली पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातात ६ नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत," अशी माहिती भजनलाल शर्मा यांनी एक्सवरुन दिली आहे.

Comments
Add Comment

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका