Wednesday, April 30, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा शिरकाव

केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा शिरकाव

६ रुग्ण गंभीर; एकाचा मृत्यू मच्छर चावल्याने पसरतो आजार

बंगळूरु : केरळ सरकारच्या आरोग्य विभागाने मंगळवारी राज्यात वेस्ट नाईल तापाबाबत अलर्ट जारी केला आहे. राज्यातील कोझिकोड, त्रिशूर आणि मलप्पुरममध्ये १० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यातील ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.त्याचवेळी,त्रिशूरमध्ये या तापामुळे एका ७९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार,हा आजार मच्छर चावल्याने होतो. तापासोबतच उलट्या,जुलाब आणि डोकेदुखीच्या तक्रारी आहेत.वेस्ट नाईल तापाच्या १० पैकी सहा प्रकरणांमध्ये लक्षणे दिसत नाहीत.अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने रुग्णांची कोणतीही अधिकृत आकडेवारी शेअर केलेली नाही. मात्र, सर्व जिल्ह्यांच्या मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेसह देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, सर्व जिल्हे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना नियमित स्वच्छता करण्याच्या आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.ते म्हणाले की, २०११ मध्येही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वेस्ट नाईल तापाचे रुग्ण आढळून आले होते. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. कोणाला ताप किंवा इतर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment