Saturday, October 5, 2024
Homeताज्या घडामोडीUtkarsha Rupwate : वंचितच्या शिर्डीमधील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक!

Utkarsha Rupwate : वंचितच्या शिर्डीमधील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक!

हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार

शिर्डी : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राजकीय नेत्यांच्या गाड्या फोडण्याचे व अपघात होण्याचे प्रकार तर दर आठवड्याला घडत आहेत. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांच्या गाडीवर काल हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गाडीच्या समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षा रुपवते सुखरूप आहेत.

उत्कर्षा रुपवते या काल रात्री अकोले राजूर (जिल्हा अहिल्यानगर) येथील प्रचारदौरा संपवून संगमनेरला परत येत असताना त्यांच्या कारवर दगडफेक झाली. रस्त्यालगतच्या झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले.

गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर उत्कर्षा यांनी कार्यकर्त्यांना एक आवाहन केलं. त्या म्हणाल्या, मी सुखरूप असून या क्षणी राजूर पोलीस स्टेशन मध्ये आहे. कार्यकर्त्यांनी घरीच राहावे. राजूरच्या दिशेने कोणीही येऊ नये. कृपया संयम राखा. आपल्याला निवडणूक तडीस न्यायची आहे. उद्या माझा कोपरगावचा पूर्वनियोजित दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे, आपण तिकडे भेटूयात, असं त्या म्हणाल्या.

उत्कर्षा रुपवते यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्या शिर्डीतून उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला आला आणि भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळेच नाराज होऊन उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश करत शिर्डी लोकसभेची उमेदवारी मिळवली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -