Supriya Sule : मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी!

पवार विरुद्ध पवार सामन्यात कोणता नवा ट्विस्ट?


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आज तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी (NCP) सर्वात चुरशीची लढत असलेल्या बारामती मतदारसंघातही (Baramati Loksabha) मतदान होत आहे. मात्र, त्यातच शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक लक्ष वेधून घेणारी कृती केली आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे अजित पवार विरुद्ध शरद पवार (Ajit Pawar VS Sharad Pawar) असा संघर्ष टोकाला गेलेला असतानाच सुप्रिया सुळे या बारामतीतील मतदानाच्याच दिवशी थेट अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी जाऊन धडकल्या आहेत. या नव्या ट्विस्टमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


बारामतीत सध्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) असा लढा आहे. बारामतीत राष्ट्रवादीचा मतदार विभागला आहे. मात्र, त्यातच सुप्रिया सुळेंनी एक नवी खेळी खेळली आहे. मतदान केल्यानंतर त्या कोणालाही सोबत न घेता अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या. या भेटीमागील कारण सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आशाताई पवार म्हणजेच अजित पवारांच्या आईच्या भेटीसाठी त्या इथे दाखल झाल्याचं त्या म्हणाल्या. मात्र, केवळ काकींचा आशीर्वाद घेणं हेच एक कारण या भेटीमागे असू शकतं का यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.



भेटीनंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?


सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या काटेवाडीमधील घरी जाऊन अजित पवारांच्या आई आशा पवार यांची भेट घेतली. यावेळी घरी अजित पवार आणि सुनेत्रा पवार नव्हत्या. काकींना भेटण्यासाठी आपण आलो होतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 'आशा काकींना भेटायला आली होती, त्यांचा आशिर्वाद घ्यायला आली होती', असं त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं.



मतदानावर होऊ शकतो परिणाम


बारामतीमध्ये मतदानासाठी अजून काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे जे आता मतदान करणार आहेत, त्यांच्यावर या भेटीचा काही परिणाम होणार का आणि मते फिरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निवडणुकीत प्रचाराच्या वेळी पवार वि. पवार अशी लढाई दाखवण्यात आली मात्र हे कुटुंब एकच आहे का? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे लढाई होत असताना दोन्ही नेते कुटुंब म्हणून एक राहणार असतील, तर मतदार किंवा कार्यकर्ते नक्कीच विचार करतील.


Comments
Add Comment

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द