देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण ९३ मतदारसंघाचा समावेश होता. यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघ, गुजरातमधील २५, उत्तर प्रदेशातील १०, कर्नाटकातील १४, मध्य प्रदेशातील ९, छत्तीसगडमधील ७, बिहारमधील ५, आसाम ४, पश्चिम बंगालमधील ४, गोव्यातील २ आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांचा समावेश होता. यामध्ये सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजता मतदान संपले, तेव्हा देशभरात सुमारे ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात या वेळेत ५४.०९ टक्के मतदान पार पडले.


यापैकी देशभरात सर्वाधिक मतदान ७५.०१ आसाममध्ये झाले तर सर्वात कमी मतदान ५४.०९ टक्के मतदान महाराष्ट्रात झाले.


दरम्यान, यामध्ये महाराष्ट्रातील बारामती, कोल्हापूर, सांगली या चर्चेतील लोकसभा मतदारसंघांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. यांपैकी बारामतीत सर्वात कमी ४७.८४ टक्के, कोल्हापुरात ६३.७१ तर ५२.५६ टक्के मतदान झाले.


तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील मतदान




  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - ५४.७५ टक्के

  • रायगड - ५०.३१ टक्के

  • लातूर - ५५.३८ टक्के

  • सांगली - ५२.५६ टक्के

  • बारामती - ४७.८४ टक्के

  • हातकणंगले - ६२.१८ टक्के

  • कोल्हापूर - ६३.७१ टक्के

  • माढा - ५०.०० टक्के

  • उस्मानाबाद - ५६.८४ टक्के

  • सातारा - ५४.७४ टक्के

  • सोलापूर - ४९.१७ टक्के

Comments
Add Comment

राज्यावर पावसाचं संकट कायम ; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : एरवी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडणे थांबते. पण यंदा नोव्हेंबर महिना आला तरी राज्यातच नाही तर देशातही

बिहार निवडणूक : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असलेले 'हे' मतदारसंघ आहेत बिहारच्या राजकारणातील चर्चेच्या केंद्रस्थानी

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या

क्यूएस क्रमवारीत भारतातील शैक्षणिक संस्थांची घसरण

नवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांची जागतिक क्रमवारी ठरविणाऱ्या क्यूएस क्रमवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यंदा

बिहारमध्ये आज मतदान

पहिल्या टप्प्यात अनेक मातब्बरांचे भविष्य मतदानपेटीत बंद होणार नवी दिल्ली  : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी

बिहार मतदान: लोकशाहीच्या उत्सवाचा आज पहिला टप्पा, मतदान करण्यासाठी मोदींनी केले आवाहन!

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडणार आहे. यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रकियेला

किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या