
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) साठी आता चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. ही स्पर्धा जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या स्पर्धेत असाही एक संघ उतरणार आहे यात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
हा युगांडाचा संघ आहे. त्यांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. या १५ सदस्यीय संघात भारताचे ३ आणि पाकिस्तानचे २ खेळाडू आहेत. युगांडा संघाचे नेतृत्व ब्रायन मसाबा करणार आहेत.
युगांडाकडून खेळणार तीन भारतीय खेळाडू
हे तीनही खेळाडू रोनक पटेल, अल्पेश रमजानी आणि दिनेश नकरानी आहे. ३५ वर्षीय रोनक पटेलचा जन्म गुजरातच्या आणंद शहरात झाला होता. त्यांचे लहानपण तिथेच गेले. तर २९ वर्षीय अल्पेश रमजानीची कहाणी रौनक पटेलप्रमाणेच आहे. अल्पेशचा जन्मही मुंबईत झाला होता. त्यानंतर क्रिकेट करिअरसाठी युगांडाला गेला.
📢 Squad Unveiled! 🏏 Uganda's finest cricketers are geared up for the T20 World Cup in the West Indies & USA! 🌟🏆 Let's cheer loud for the Cricket Cranes as they take flight! 🇺🇬👏 #T20WC #UgandaProud #WeAreCricketCranes pic.twitter.com/Wg3QXXBz3J
— Uganda Cricket Association (@CricketUganda) May 6, 2024
गुजरातच्या कच्छमध्ये जन्मलेला दिनेश नकरानी साधारण सात वर्षांपूर्वी युगांडाला आला होता. दिनेशने २०१४मध्ये सौराष्ट्रसाठी टी-२०मध्ये पदार्पण केले होते. याआधी त्याने अंडर १९ स्तरावरही गुजरातचे प्रतिनिधित्व केले होते. दुसरीकडे या संघात पाकिस्तानचे दोन खेळाडू रियाजत अली शाह आणि बिलाल हसन यांचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानातून येऊन युगांडामध्ये राहिले.