Marathi Vs Gujrati : गिरगावनंतर घाटकोपरमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना गुजराती रहिवाशांकडून प्रवेशबंदी

निवडणुकीपूर्वी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळणार?


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सध्या राजकीय पक्षांचा (Political Parties) जोरदार प्रचार सुरु आहे. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी पार पडत आहे. तर शेवटच्या टप्प्यात मुंबई आणि पुण्यात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत मुंबईत प्रचाराची हवा जोरदार वाहणार आहे. राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्ते उन्हातान्हात रॅली काढताना दिसतायत. मात्र, आणखी ताकद लावून प्रचार सुरु होण्यापूर्वीच एक मोठी घडामोड मुंबईत घडली आहे, ज्यामुळे निवडणुकीपूर्वी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती (Marathi Vs Gujrati) वाद चिघळण्याची शक्यता आहे.


ईशान्य मुंबईतील (Mumbai North East Lok Sabha) एका गुजराती रहिवाशांच्या सोसायटीमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांना प्रवेश नाकारण्यात आला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय आहे. काल संध्याकाळी ठाकरे गटाचे शिवसैनिक घाटकोपर पश्चिम परिसरात निवडणुकीचा प्रचार करत होते. या भागात असणाऱ्या समर्पण सोसायटीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे ऐन मतदानापूर्वी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.


समर्पण सोसायटीत गुजराती रहिवाशांची संख्या जास्त आहे. त्यांच्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीच्या आवारात येण्यापासून मज्जाव करण्यात आला. तुम्हाला सोसायटीत प्रचार करता येणार नाही, असे सोसायटीच्या लोकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती हा वाद तापण्याची शक्यता आहे. चौथ्या टप्प्याचे मतदान संपून मुंबईत जेव्हा शेवटच्या टप्प्यातील प्रचार सुरु होईल तेव्हा या मुद्द्यावरुन वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.