Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीJason Holton : ब्रिटनमधील सर्वात वजनदार व्यक्तीचा वयाच्या ३३ व्या वर्षी मृत्यू!

Jason Holton : ब्रिटनमधील सर्वात वजनदार व्यक्तीचा वयाच्या ३३ व्या वर्षी मृत्यू!

तब्बल ३१८ किलो वजन; अतिरिक्त चरबीमुळे अवयव झाले निकामी

लंडन : ब्रिटनमधील सर्वात वजनदार माणूस म्हणून ओळखला जाणारा जेसन हल्टन (Jason Holton) याचे काल ४ मे रोजी निधन झाले. शरीराच्या स्थूलपणामुळे वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे त्याचे अवयव निकामी होत गेले. जेसनवर उपचार सुरु होते, पण त्याचे अवयव उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने त्याला वाचवता आले नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

आठवड्याभरानंतर जेसनचा ३४ वा वाढदिवस होता. पण त्याआधीच त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. जेसनचे वजन ३१८ किलो होते. त्याला सरे काउंटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या ६ बंबांच्या मदतीने त्याला त्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. जेसनची आई लिसा यांनी हॉस्पिटलमध्ये त्याची खूप काळजी घेतली. जेसनचा मृत्यू होणार असल्याचे डॉक्टरांनी आठवड्याभरापूर्वीच सांगितले होते तसेच जेसनची किडनी पूर्णपणे निकामी झाली होती. त्यामुळे त्याची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली होती. जेसनला किडनी डायलिसिस आणि आयव्ही ड्रिपवर ठेवण्यात आले होते, परंतु तरीही त्याचे सर्व अवयव हळूहळू निकामी होऊ लागले. अशी माहिती लिसा यांनी दिली.

जेसन एका सामान्य माणसापेक्षा ४ पट जास्त म्हणजे एका दिवसात सुमारे १० हजार कॅलरीज खात असे. २०२२ मध्ये, जेसनला अनेक वेळा स्ट्रोक येणे किंवा रक्त गोठणे अशा त्रासांचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे तो २०२० साली पडला होता, त्यावेळी अग्निशमन दलाचे ३० हून अधिक कर्मचारी आणि अभियंते यांच्या पथकाने मिळून सुमारे ७ तासांच्या अथक परिश्रमानंतर क्रेनच्या सहाय्याने त्याला अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून विमानातून बाहेर काढले होते. अखेर स्थूलत्व आणि अवयव निकामी झाल्याने काल त्याचा मृत्यू झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -