तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला आता सहा महिने होऊन गेले पण हे यद्ध अजून पूर्णपणे थांबलेले नाही. काही काळ शांतता मग पुन्हा संघर्ष अशा पद्धतीने हे युद्ध मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. या युद्धाचा इराणच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रतिकूल परिणाम झाला आहे. घरातले सामान विकून जगण्याची वेळ अनेकांवर आली आहे. काहींनी रक्त, केस याचीही विक्री करायला सुरुवात केली आहे. विग तसेच हेअर एक्सटेंशन्स तयार करणाऱ्यांना केस विकून आणि रुग्णालयांना तसेच रक्तपेढ्यांना रक्त विकून नागरिक जगण्यासाठी पैसा उभा करत आहेत. गरज म्हणून मोबाईल, लॅपटॉप सारखी गॅजेट हवी असल्यास ती खरेदी करण्याऐवजी भाडेपट्टीवर घेतली जात आहेत.
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर लागू केलेल्या नव्या आयात शुल्क (टॅरिफ) धोरणाविरोधात 25 अमेरिकन राज्यांनी ...
इराणची अर्थव्यवस्था ही फक्त जगण्यापुरत्या आवश्यक वस्तू आणि सेवांच्या खरेदी - विक्रीची अर्थव्यवस्था झाली आहे. युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडणे शक्य होईल का ? असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. इराणच्या सांख्यिकी केंद्राच्या आकडेवारीनुसार इराणमधील मासिक महागाई दर ६६ टक्क्यांवर आणि वार्षिक महागाई दर ८७.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जनतेची क्रयशक्ती संपली आहे. सतत काही तरी विकून किंवा एकाच्या बदल्यात दुसरे अशा स्वरुपाचे व्यवहार करून जगण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
Pakistan Suicide Bombing : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात रविवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात किमान 14 जणांचा मृत्यू झाला असून दोन डझनहून अधिक जण जखमी ...
आर्थिक संकटाचा परिणाम इराणमधील आरोग्य सेवांवरही झाला आहे. रुग्णालयाची बिले भरण्यासाठी, वैद्यकीय उInflationपचार घेण्यासाठी आणि दैनंदिन औषधे खरेदी करण्यासाठी लोक आता हप्त्यांमध्ये पैसे भरत आहेत. अनेक गरजेच्या वस्तूंच्या किमती या सामान्यांच्या उत्पन्नापेक्षा झपाट्याने वाढत आहेत. यामुळे रोजचा दिवस काढणे हेच अनेकांसाठी मोठे आव्हान झाले आहे.




