CBSC: काही दिवसांपासुन दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमामध्ये व्हायरल होत आहेत. हा प्रकार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निदर्शनास आला. या पार्श्वभूमीवर मंडळाने निकालाच्या संभाव्य तारखेबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळाद्वारे जाहीर केली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल २० मेनंतर जाहीर केले जाऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
देशभरातून तब्बल ३९ लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची परीक्षा दिली आहे. त्यात बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत, तर दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते १३ मार्च या दरम्यान घेण्यात आल्या. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये निकालाची तारीख नमूद केलेली बनावट परिपत्रके फिरत असल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळे समाजमाध्यमात फिरत असलेल्या निकालाच्या बनावट तारखांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन सीबीएसईकडून करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर सीबीएसईने अधिकृत संकेतस्थळाद्वारे संदेश प्रसारित केला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल २० मेनंतर जाहीर केले जाऊ शकतात असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट तारखांमुळे संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…