धावत्या लोकलमधून प्रवाशाने वाशीच्या खाडीत मारली उडी

वाशी : धावत्या लोकलमधून प्रवाशाने वाशीच्या खाडीत उडी मारली. ही धक्कादायक घटना नवी मुंबईतील वाशी खाडी परिसरात गुरुवार पाच फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी घडली. तरुण प्रवाशाने लोकलमधून वाशीच्या खाडीत उडी मारल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवाशांना आरडाओरडा केला. खाडीत उडी मारणाऱ्या तरुणाचा जीव मच्छीमारांनी जीवाची बाजी लावून वाचवला.


हाती आलेल्या माहितीनुसार, लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलच्या दिशेने जात होती. या गाडीमध्ये भारत शिवराम फुळमाळी नावाचा तरुण होता. लोकल वाशीच्या खाडीवरून जात होती त्यावेळी तरुणाने वेगाने हालचाल केली आणि थेट वाशीच्या खाडीत उडी मारली. पण मच्छीमारांनी जीवाची बाजी लावून भारत शिवराम फुळमाळी याला वाचवले. भारतने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याचे कारण अद्याप समजलेले नाही.


भारतच्या खिशात एक ओळखपत्र सापडले. या ओळखपत्रावरून तो पोलीस मित्र असल्याचे कळले. भारत हा अहिल्यानगरच्या पार्थडी तालुक्यातील आंबिकानगरचा रहिवासी आहे. भारतने केलेल्या कृतीप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.



हार्बरची वाहतूक विस्कळीत


भारत शिवराम फुळमाळीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे काही काळासाठी हार्बरची वाहतूक थांबवण्यात आली होती. यामुळे दुपारी काही तासांसाठी हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली होती. पण लवकरच परिस्थिती नियंत्रणात आली. तोपर्यंत प्रवाशांचे हाल झाले.

Comments
Add Comment

Nag Panchami 2026 : नागपंचमीला 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्ह

Nashik : 'मिशन ग्रीन मान्सून' चा रविवारी ८ वा टप्पा, ऑनलाइन नोंदणी केलेल्या नाशिककरांना होणार थेट देशी रोपांचे वाटप

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत नाशिक शहर हरित व समृद्ध बनवण्यासाठी

Nashik : नाशिक महापालिकेत महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते ध्वजारोहण

Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे महापौर हिमगौरी

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Nashik : नाशिकमध्ये वीर सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘वीर प्रेरणास्थळ’ उभारणार, वीरनारी यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मान

Nashik : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान

Nashik : जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील