नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक निवडणूका होऊन नवी कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकांच्या हाती गावाच्या चाव्या असतील. त्यामुळे विकासकामांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.


आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांहून अधिक असल्याने जिल्हा परिषद आणि पंधराही पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार सध्या प्रशासकाच्या हाती आहे. त्यातच आता जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपुष्टात येणार असल्याने तेथेही प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.


जिल्ह्यात पेठ व सुरगाणा हे दोन तालुकेवगळता उर्वरित सर्व तालुक्यांमधील ६२२ ग्रामपंचायतींची मुदत यंदा संपुष्टात येत आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार संबंधित ग्रामपंचायतींवर आता प्रशासक नेमण्याची तयारी सुरुरू झाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासक नियुक्तीसंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत.


राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार संबंधित गावांमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडून नवी कार्यकारिणी नियुक्तीपर्यंत प्रशासकराज असणार आहे. एकूण परिस्थिती लक्षात घेता लवकर संबंधित गावांमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे. त्यामुळे गावांच्या विकासावर परिणाम होणार आहे.



२०२ गावांत मतदारयाद्यांचा कार्यक्रम


जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ याकाळात मुदत संपुष्टात आलेल्या बारा तालुक्यांतील २०२ ग्रामपंचायतींमध्ये मतदारयाद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये इगतपुरीच्या ६५, निफाडच्या ३२, बागलाणच्या ३०, त्र्यंबकेश्वर १८, कळवण १४, मालेगाव १२, येवला व नांदगाव प्रत्येकी ८, नाशिक ७, दिंडोरी ४ तर देवळा आणि पेठमधील अनुक्रमे २ व एका गावांचा समावेश आहे. मतदार याद्यांचा कार्यक्रम लक्षात घेता एप्रिल-मेमध्ये या गावांना नवे कारभारी मिळू शकतात.

Comments
Add Comment

Nashik : पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी दोस्ती फाउंडेशनचा मदतीचा हाथ, भव्य अन्नदान व प्रसाद वाटप

Nashik : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन

Rajvardhini Chavan: वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांत ऐतिहासिक पराक्रम; बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी चव्हाणने सर केले तब्बल १०० गड-कोट

पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Barshi Crime : माता न तू वैरिणी! १० महिन्यांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

बार्शीत थरकाप उडवणारी घटना, आईने चिमुकलीची गळा आवळून केली हत्या   सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Beed Pakistani Connection : बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; एटीएसची धडक कारवाई

बीड : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra ATS) केलेल्या धडक तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील