राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाचे प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


श्री. लाड हे डॉ. शिरोडकर हायस्कूल व महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी असून, युवक क्रीडा मंडळ, परळ या संघातर्फे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये त्यांनी १९८६ ते १९८९ या कालावधीत सलग चार वेळा मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली.


अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्यांनी बी.कॉम., एम.ए. व एल.एल.एम. अशी उच्चशिक्षणाची पदवी संपादन केली आहे. कोकण व मुंबईतील विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असून सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.


दुकाने व आस्थापना विभागात कार्यरत असताना त्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराविरोधात प्रभावी जनजागृती केली. यासाठी त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच व्यापारी संघटनांच्या सहकार्याने नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

IND(w) vs ENG(w) : ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात भारताच्या 'रन'रागिणींचा महा-पराक्रम; इंग्लंडवर २७० धावांनी दणदणीत विजय

लंडन: क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने नवा इतिहास

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेचा टी२० पराभवाशी संबंध नाही; २०२७ वर्ल्ड कपसाठी गिलची रणनीती स्पष्ट

बर्मिंगहॅम: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर असून, उद्या १४ जुलैपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे

FIFA2026 : 'VAR' आणि हाय-टेक नियमांचा फुटबॉलवर वाढता प्रभाव; चाहत्यांमध्ये आणि खेळाडूंमध्ये संभ्रम

फिफा विश्वचषक २०२६ मधील अनेक सामने आता मैदानातील खेळाडूंच्या कौशल्यापेक्षा 'व्हिडिओ असिस्टंट रेफरी' (VAR) आणि

Wimbledon 2026 : विंबलडनच्या सेंटर कोर्टवर वैभव सूर्यवंशी, फेव्हरेट खेळाडूबद्दल केला मोठा खुलासा!

Wimbledon 2026 फायनल (Final) सामन्याचा थरार पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट संघातील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा

IND vs ENG ODI : टीम इंडियाला दुहेरी धक्का! हर्षित राणा-वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे बाहेर; BCCI ने केले मोठे बदल

- हर्षित राणाला ग्रेड-१ हॅमस्ट्रिंग दुखापत मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार विजय मिळवल्यानंतर आता

IND (W) vs ENG (W) : लॉर्ड्स टेस्टमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघांचा जलवा! ऐतिहासिक विजयापासून फक्त ४ विकेट्स दूर

IND (W) vs ENG (W) : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या ऐतिहासिक टेस्ट (कसोटी)