Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीतुम्ही Google Pay अथवा Phone pay चा वापर करता तर जरूर वाचा...

तुम्ही Google Pay अथवा Phone pay चा वापर करता तर जरूर वाचा ही बातमी

मुंबई: भारतात ऑनलाईन पेमेंटची(online payments) क्रेझ वेगाने वाढत आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय आल्यानंतर खिशातून कॅश घेऊन फिरणे अनेकांना जड झाले आहे. गुगल पे आणि फोनपेमुळे कुठूनही कधीही पैसे भरणे शक्य झाले आहे. देशातील मोठ्या शॉपिंग मॉलपासून ते रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्यांपर्यंत सगळीकडे हल्ली तुम्ही ऑनलाईन पेंमेंट करू शकता.

ऑनलाईन पेमेंटची सुविधा वाढली तशी ऑनलाईन फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. तुमची छोटीशी चूक तुमचे बँक अकाऊंट खाली करू शकते. जर तुम्ही यूपीआय पेमेंट गुगल पे आणि फोन पे वापरत असाल तर तुम्हाला तुमचा यूपीआय पिन काळजीपूर्वक वापरला पाहिजे. तुमचा पासवर्ड चोरी होऊ नये असे वाटत असेल तर एकाच पिनचा वापर दीर्घकाळ करू नये. एकाच पिनचा वापर दीर्घकाळ केल्याने तो चोरी होण्याचा धोका अधिक वाढतो.

असा बदला Google Pay पिन

गुगल अॅप ओपन करा.
आपल्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा.
आता बँक अकाऊंटवर टॅप करा. जर एकापेक्षा अधिक बँक अकाऊंट यूपीआय पेमेंटसाठी लिंर आहे तर कोणत्यातरी एका बँक अकाऊंटला निवडा.
एक नवे पेज ओपन होईल. येथे वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन डॉट दिसतील. यावर टॅप करा.
आता ‘Change UPI PIN’ चा पर्याय दिसेल.
आता तुमचा सध्याचा पिन टाका.
त्यानंतर नवा पिन टाकण्याचा पर्याय येईल. नवा पिन टाका
यानंतर नवा पिन पुन्हा टाकून दुसऱ्यांदा कन्फर्म करा.
तुमचा पिन पासवर्ड बदलेल.

Phone pay बदलण्याची ही पद्धत

सगळ्यात आधी Phone pay अॅप खोला.
फोन पे अॅपच्या होम स्क्रीनवर प्रोफाईल पिक्चर टॅप करा.
Payment Methods sectionच्या उजव्या बाजूला स्क्रोल करा.
त्या बँक अकाऊंटला सिलेक्ट करा ज्याचा यूपीआय पिन रिसेट करायचा आहे.
Reset UPI PIN पर्यायवर क्लिक करा.
निवडलेल्या बँक अकाऊंटवरून लिक आपल्या डेबिट/एटीएम कार्डचे डिटेल्स भरा.
कार्ड डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एसएमएसवरून ओटीपी पाठवला जाईल.
मोबाईलवर हा ओटीपी टाका.
तुमच्या डेबिट अथवा एटीएम कार्डशी लिंक ४ अंकांचा एटीएम पिन टाका.
नवा यूपीआय पिन सेट करण्यासाठी ४ अथवा ६ अंकाचा यूपीआय पिन टाका.
यानंतर कन्फर्म बटणावर टॅप करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -