Friday, May 15, 2026

Rachin Ravindra : केकेआरला मोठा धक्का ! एकही सामना न खेळता स्टार खेळाडू हंगामातून बाहेर

Rachin Ravindra : केकेआरला मोठा धक्का ! एकही सामना न खेळता स्टार खेळाडू हंगामातून बाहेर

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये केकेआरने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. या हंगामात ११ पैकी चार सामने जिंकत ९ गुण मिळवले आहेत. त्यांना एक सामना पावसात वाहून गेल्यामुळे एका गुणाचा फायदा झाला आहे. सध्या केकेआर गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. उर्वरित सामने केकेआरसाठी महत्त्वाचे आहेत. या टप्प्यावर केकेआरला मोठा धक्का बसला आहे. न्युझीलंडचा स्टार खेळाडू रचिन रविंद्र आयपीएल मध्यावरच सोडत मायदेशी परतला आहे. न्युझीलंडच्या इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी रचिन मायदेशी परतल्याचे सांगितले जात आहे.

न्युझीलंडच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात चार जून पासून होणार आहे. या दौऱ्यात तीन टेस्ट मॅच होणार आहेत. यासाठी रचिन रविंद्रने आयपीएल सोडली आहे.२०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (World Test Championship) गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे; त्यांनी दोन सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये रचिन रवींद्रने उत्कृष्ट कामगिरी करत झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १६५ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर, वेस्ट इंडिजविरुद्धही त्याने फलंदाजीत आपली प्रभावी कामगिरी कायम राखत १७६ धावांची मोठी खेळी केली होती.आयपीएल २०२६ च्या लिलावात कोलकाताने रवींद्रला दोन कोटी रुपयांच्या मूळ किमतीता घेतले होते. मात्र या हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळली नाही.

कोलकाता करो या मरो च्या स्थितीत

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कोलकाताने हंगामाची सुरुवात सलग पाच पराभवाने केली होती. संघाने हळूहळू लय पकडली होती. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवण्याच्या निर्धाराने संघ मैदानात उतरणार आहे. त्यांना मागील सामन्यात, विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >