Friday, July 19, 2024
Homeक्राईमNagpur News : धक्कादायक! लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच थांबला जीवनप्रवास!

Nagpur News : धक्कादायक! लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच थांबला जीवनप्रवास!

पत्नीला म्हणाला, काम आटपून येतो आणि… नेमकं काय घडलं? 

नागपूर : कुणाचे नशीब कधी बदलेल आणि काळाचा घाव कधी पडेल काही सांगता येत नाही. आयुष्यात लग्नगाठ बांधून आपल्या जोडीदारासोबतचा जीवनप्रवास करणे सुखकारी असते. मात्र हा सुखी प्रवास सुरु होताच संपणे म्हणजे काळाने केलेला घात. अशीच एक ह्रदयद्रावक घटना नागपूर येथे घडली आहे. नुकतेच लग्न झालेल्या वराचा लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी अपघात होऊन त्याचे प्राण गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

निखिल विद्याधर हर्षे (३२) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी हा तरूण लग्नसमारंभातून मोकळा होऊन काही कामानिमित्त बाहेर पडला होता. जबलपूर ते नागपूर आउटर रिंगने जात असताना समोरुन येणाऱ्या एका भरधाव वाहनाची धडक लागली. या धडकेत निखिल गंभीर जखमी झाला असता त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

दरम्यान, अपघातात समोरील अज्ञात आरोपी वाहन चालक पळून गेला. या अज्ञात वाहनचालकावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून शोध सुरु केला आहे. तत्पूर्वी पत्नीला काम आटपून येतो असे सांगून निघालेला निखिल स्वत: न परतता त्याचे पार्थिवच घरी पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -