Sairat Movie : मराठी सिनेमाला सातासमुद्रापार नेणाऱ्या 'सैराट'ला आठ वर्षे पूर्ण!

  374

रिंकूने शेअर केले आर्ची-परशाचे अनसीन फोटोज


मुंबई : मराठी सिनेसृष्टीत (Marathi cinema) दर्जेदार सिनेमांचा तुटवडा जाणवत असताना एक असा सिनेमा आला की ज्याने मराठी सिनेमांचं समीकरणच बदलून टाकलं. मराठी सिनेमाला सातासमुद्रापार नेणाऱ्या या सिनेमाने मराठीत आजवरची सर्वाधिक १०० कोटींची कमाई केली. तो म्हणजे नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट' सिनेमा (Sairat Movie). या सिनेमाने नावाप्रमाणेच प्रेक्षकांना सैराट करुन सोडलं. आजही कोणत्याही कार्यक्रमात 'झिंगाट' (Zingaat) गाण्यावर नाचल्याशिवाय लोकांचं मन भरत नाही, ही या सिनेमाची आणि अजय-अतुलच्या (Ajay-Atul) संगीताची जादू आहे.


'सैराट' सिनेमाला आज आठ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या चित्रपटाची नायिका रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) म्हणजेच सगळ्यांची लाडकी आर्ची हिने आर्ची-परशाचे (Archi-Parshya) काही अनसीन फोटोज शेअर केले आहेत. पडद्यामागील रिंकू-आकाशची धमाल, घोडेस्वारी करतानाचा फोटो आणि तिचं पहिलं फोटोशूट या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "सैराटला आज ८ वर्ष पूर्ण झाली…" असं कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिलं आहे. हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांनी रिंकूच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.





अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत सैराटचे तिचे गाजलेले संवाद पोस्ट केले आहेत. तर एकाने,"मराठी चित्रपट जगताला वरच्या टोकावर नेण्याचा आणि मराठीची ताकद जगाला दाखवण्याचा नागराज मंजुळेचा सर्वोत्तम प्रयत्न होता. अजय-अतुल यांनी आपल्या ज्ञानाने मराठी संगीत जगभर गाजवले. उमदा अभिनय परश्या आर्ची" असं म्हणत या सिनेमाचं कौतुक केलं तर एकाने सैराटचा दुसरा पार्ट काढण्याची मागणी केली आहे.


'सैराट' सिनेमा २९ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा पाहण्यासाठी लोक एक-दोनदा नव्हे तर तब्बल १७ वेळा सिनेमागृहात गेल्याचीही उदाहरणे आहेत. प्रेम, मैत्री आणि मजामस्ती दाखवत असतानाच एका महत्त्वाच्या सामाजिक विषयावर या चित्रपटाने भाष्य केलं होतं. समाजातील सत्य परिस्थिती दाखवण्यात नागराज मंजुळे यशस्वी झाला आणि म्हणूनच हा चित्रपट लोकांनाही प्रचंड आवडला. रिंकूने शेअर केलेल्या फोटोजच्या निमित्ताने आठ वर्षांपूर्वीचा रिंकूचा लूक आणि तिच्यात इतक्या वर्षांमध्ये झालेले बदल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ती आठवीत शिकत असताना तिने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. तेव्हाचे रिंकू-आकाश आणि सिनेमाला यश मिळाल्यानंतर त्यांच्यात घडलेला बदल खरंच लक्ष वेधून घेणारा आहे.

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत