Gold Rate : ग्राहकांना सुखद धक्का! सोनं-चांदीच्या दरात घसरण; ग्राहकांना दिलासा

जाणून घ्या काय आहेत सध्याचे दर


मुंबई : सध्या अनेक ठिकाणी लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच सोने व चांदीच्या वाढत्या दरामुळे खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसला होता. मात्र आता सोने-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. गगनाला भिडत असणाऱ्या सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण होत असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे. जाणून घ्या सध्याच्या सोन्या-चांदीच्या किंमती काय आहेत.


गेल्या दोन महिन्यांच्या विक्रमी दरवाढीनंतर मागील तीन दिवसांत सोन्या आणि चांदीच्या किंमतीत लक्षणीय घट दिसून आली आहे. सततच्या वाढीमुळे सोन्याची किंमत ७५,००० रुपयांवर झेप घेईल असे दिसत होते. पण मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळपासून सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर ७०,९८७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत आहेत. तर दिवसभरात या दरांमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, चांदीचा दर ८०,८२६ रुपये प्रति किलोवर घसरला आहे. मात्र सप्टेंबरपर्यंत चांदीचे दर वाढून ८३,८३९ रुपये प्रति किलोवर येण्याची शक्यता वर्तवली आहे.



सराफा बाजारातील सोन्याचा दर


दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर ७२,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. सोन्याच्या दरात १४५० रुपयांनी घट झाली आहे. पुढील काही दिवस सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. सोनं ७०,००० रुपयांवर येण्याची शक्यता आहे.


दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६३०० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१६०० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५५८० रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे.



आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीची किंमत


भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर स्वस्त होत असताना जागतिक बाजारात दोन्ही धातूच्या किंमती वधारल्या आहेत. बुधवारी सोन्याच्या जागतिक किंमतीतही घसरण दिसून आली. कॉमेक्सवर सोन्याचे जागतिक फ्युचर्स ०.१८% किंवा ४.१० डॉलरने घसरून २,३३८ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते, तर सोन्याची स्पॉट किंमत प्रति औंस २,३२५.१९ डॉलरवर तेजीसह ट्रेंड करत आहेत. त्याचवेळी, बुधवारी चांदीच्या जागतिक किमतीत वाढ नोंदवली गेली आणि कॉमेक्सवर चांदीचे फ्युचर्स ०.२६% किंवा ०.०७ डॉलर वाढीसह २७.७१ डॉलर प्रति औंसवर तर चांदीची जागतिक स्पॉट किंमत २७.४० डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Healthy Juice : तुम्ही कधी ABC ज्यूस प्यायला आहे का? कसा बनवायचा आणि शरीराला काय फायदे होतात?

ABC ज्यूस म्हणजे काय? चला जाणून घेऊया : सध्या सोशल मीडियावर ABC ज्यूस चे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. हे एक आरोग्यदायी

Nashik : महापालिकेच्या रुग्णालयांचा स्थायी समितीकडून पंचनामा, समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी स्वतंत्र बैठक

Nashik : नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) बिटको, डॉ. झाकीर हुसेनसह अन्य रुग्णालयांतील आरोग्यसेवेच्या ढिसाळ कारभारावर

Millets Benefits : नाचणी,ज्वारी, बाजारी यांच्यात फरक काय? आरोग्यासाठी कोणते धान्य फायदेशीर?

नाचणी, ज्वारी आणि बाजरी यांच्यात काय फरक आहे? वजन कमी करण्यासाठी, मधुमेह नियंत्रणासाठी आणि निरोगी आहारासाठी

Overripe Fruits Recipes : फळं जास्त पिकली? फेकू नका! बनवा भन्नाट आणि स्वादिष्ट पदार्थ; मुलंही मागून-मागून खातील

Nashik Simhastha Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मनपात मानधनावर भरतीची तयारी

Nashik Simhastha Kumbhmela : आगामी सिंहस्थ कुंभमळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आणि प्रत्यक्ष