Healthy Juice : तुम्ही कधी ABC ज्यूस प्यायला आहे का? कसा बनवायचा आणि शरीराला काय फायदे होतात?

ABC ज्यूस म्हणजे काय? चला जाणून घेऊया :


सध्या सोशल मीडियावर ABC ज्यूस चे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. हे एक आरोग्यदायी पेय आहे आणि प्यायलाही स्वादिष्ट आहे.मग उशीर कशासाठी?
चला तर मग जाणून घेऊया ABC ज्यूस कसं बनवतात:

ABC चे पूर्ण रूप (Fullform):

A- Apple (सफरचंद)
B- Beetroot (बीट)
C- Carrot (गाजर)

Apple, Beetroot आणि Carrot यांपासून तयार होतो ABC ज्यूस.

ABC ज्यूस चे फायदे :

हा रस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होऊ शकते तसेच, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. जे लोक वारंवार आजारी पडतात त्यांच्यासाठी हे पेय फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
या ज्यूस मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे पोटाच्या समस्या देखील दूर होतात.

निरोगी त्वचा:

ज्यांना आपली निरोगी त्वचा टिकवून ठेवायची आहे, त्यांनी या रसाचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करावा. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आतून निरोगी ठेवून तिची चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात.

निरोगी डोळे :

या रसामध्ये व्हिटॅमिन A चांगल्या प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. ज्यांना आपली दृष्टी सुधारायची आहे, त्यांच्यासाठी हे पेय एक चांगला पर्याय ठरू शकते.

निरोगी हृदय :

या रसाचे नियमित सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. जर तुम्हाला निरोगी हृदय राखायचे असेल, तर तुमच्या आहारात या रसाचा नक्की समावेश करा.

ABC ज्यूस कसा बनवायचा?

साहित्य: सफरचंद, बीट, गाजर, आले, चवीनुसार मीठ, लिंबू आणि पाणी

कृती :

  • सफरचंद, बीट आणि गाजर स्वच्छ धुवून त्याचे लहान तुकडे करा.

  • कापलेले फळांचे तुकडे आणि आले मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करा.

  • रस गाळून घ्या त्यात चवीसाठी लिंबाचा रस आणि चिमूटभर काळे मीठ घालून प्या.


 

 
Comments
Add Comment

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर