Nashik Simhastha Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मनपात मानधनावर भरतीची तयारी

Nashik Simhastha Kumbhmela : आगामी सिंहस्थ कुंभमळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आणि प्रत्यक्ष कुंभमेळ्यादरम्यान पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे नाशिक महापालिकेतील रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मानधन तत्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करून स्थायी समितीसमोर सादर करण्याचे आदेश सभापती मच्छिंद्र सानप यांनी प्रशासनाला दिले. (Nashik Simhastha Kumbhmela)



कामाचा अतिरिक्त ताण वाढला


सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. सभेदरम्यान, मनपातील वाढत्या मनुष्यबळाच्या कमतरतेवर चर्चा झाली. शहराचा वाढता विस्तार, वाढलेली लोकसंख्या आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी लक्षात घेता सध्याचे उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) मंजूर सुमारे सात हजार पदांपैकी सध्या फक्त तीन ते साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे विविध विभागांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. (Nashik Simhastha Kumbhmela)



विकासकामांवर परिणाम


परिणामी नागरिकांना सेवा देताना विलंब होत असून अनेक विकासकामांवरही त्याचा परिणाम होत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. यावर नियमित सरळसेवा भरती पूर्ण होईपर्यंत आवश्यक त्या पदांवर पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानधनावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला. त्याबाबत आवश्यक माहिती, रिक्त पदांची संख्या, आर्थिक परिणाम आणि भरतीची प्रक्रिया याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना सभापती सानप यांनी प्रशासन विभागाला दिल्या.

Comments
Add Comment

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर