“काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी”

Share

वारसा करावरून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. पित्रोदांच्या वक्तव्यामुळे भाजपासह एनडीएतील सर्व घटकपक्ष काँग्रेसला लक्ष्य करू लागले आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘काँग्रेस पक्षाचा एक मंत्र आहे. काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. म्हणजे तुम्ही जीवंत आहात तोवर काँग्रेस तुमच्यावर जास्तीत जास्त कर लावून तुम्हाला मारून टाकेल आणि तुम्ही जीवंत नसाल तेव्हा तुमच्या मुलांवर वारसा कराचा ओझं टाकेल. ज्यांनी आपला संपूर्ण पक्ष पितृसंपत्ती म्हणून आपल्या मुलांना दिला आहे तेच लोक तुमची संपत्ती तुमच्या मुलांना देण्यापासून रोखण्याच्या विचारात आहेत. तुम्ही मेहनतीने कमावलेले पैसे तुमच्या मुलांना मिळू नये असे काँग्रेसला वाटते.’,असा जोरदार हल्लाबोल मोदी यांनी केला.

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बोलताना सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील एका कराचा उल्लेख केला होता. “अमेरिकेत वारसा कर नावाचा एक कर आहे. एखाद्या व्यक्तीने १०० मिलियन डॉलर्स मूल्याइतकी संपत्ती कमावली असेल, तर त्याच्या निधनानंतर त्याच्या मुलांना साधारणपणे ४५ टक्के संपत्ती मिळते आणि उर्वरीत ५५ टक्के संपत्ती सरकार ताब्यात घेतं. हा एक वेगळा कायदा आहे. या कायद्यानुसार, तुम्ही तुमच्या हयातीत कमावलेली संपत्ती निधनानंतर जनतेसाठी सोडून दिली पाहिजे. सर्व संपत्ती नाही, परंतु, किमान निम्मी संपत्ती द्यायला हवी आणि मला हे न्याय्य वाटतं.”असे मत पित्रोदा यांनी मांडले होते.

त्यावर नरेंद्र मोदी म्हणाले, शाही परिवारातील (गांधी कुटुंब) राजकुमाराच्या सल्लागारांनी (सॅम पित्रोदा) एक वक्तव्य केले आहे. हे सल्लागार राजकुमाराच्या वडिलांबरोबरही काम करत होते. ते कुटुंब नेहमी या सल्लागाराचे सल्ले ऐकतो. ते सल्लागार म्हणाले आपल्या देशातील मध्यमवर्गीय लोक मेहनत करून पैसे कमावतात त्या पैशावर अधिक कर लावायला हवा. आता हे लोक त्याहून एक पाऊल पुढे गेले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की ते आता देशात वारसा कर लावतील. म्हणजेच आई-वडिलांकडून मिळणाऱ्या वारशावरही ते कर लावतील. याचा अर्थ तुम्ही मेहनत करून जी संपत्ती जमवता, ती संपत्ती किंवा ते पैसे तुमच्या मुलांना मिळणार नाहीत. कारण काँग्रेस सरकारचा पंजा ते पैसे तुमच्याकडून हिसकावणार आहे.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

9 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

48 minutes ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago