PM Narendra Modi : काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा!

  63

राजस्थानमधून पंतप्रधानांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल


जयपूर : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहत असताना अनेक नेते देशभरात दौरे करत आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हेदेखील सातत्याने वेगवेगळ्या राज्यांचे दौरे करत आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज राजस्थान दौऱ्यावर पोहोचले. राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर येथील जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजस्थानने प्रत्येक वेळी भाजपाला पूर्ण आशीर्वाद दिला आहे. आज रामभक्त हनुमानजींच्या जयंतीचा पवित्र दिवस आहे. हनुमान जयंतीच्या संपूर्ण देशाला हार्दिक शुभेच्छा असं म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.


देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे, लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा-जेव्हा आपण विभागलो त्यावेळी शत्रूचा फायदा झाला. काँग्रेसची सत्ता असती तर स्फोट झाले असते. त्यांच्या राजवटीत विश्वास टिकवणे कठीण आहे. काँग्रेसने रामनवमीला बंदी घातली तर कर्नाटकात हनुमान चालीसाचे पठण केल्यामुळे मारहाण करण्यात आली. अशा काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा ठरतो आहे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.



काँग्रेसवर साधला निशाणा


काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, २०१४ नंतर आणि आजही दिल्लीत काँग्रेसचे सरकार असते तर काय झाले असते. काँग्रेस असती तर आजही जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या सैन्यावर दगडफेक झाली असती व काँग्रेस सरकारने काहीच केळं नसतं. आजही सीमेपलीकडील शत्रूंनी येवून आमच्या सैनिकांची मुंडकी हिसकावून घेतली असती. सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन लागू झाली नाही, देशाच्या कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोट होत राहिले असते. काँग्रेस असती तर भ्रष्टाचाराचे नवे मार्ग शोधले असते असे पंतप्रधानांनी सभेत म्हटले.



काँग्रेसच्या काळात हनुमान चालीसा ऐकणे गुन्हा


काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा ठरतो. काही दिवसांपूर्वी काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात एका छोट्या दुकानदाराला त्याच्या दुकानात बसून हनुमान चालीसा ऐकत असल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. 'राम-राम' म्हणणाऱ्या राजस्थानमध्ये रामनवमीवर काँग्रेसने बंदी घातली होती, मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांना काँग्रेसने सरकारी संरक्षण दिले होते. मात्र भाजपाचे सरकार आल्यानंतर तुमच्या विश्वासावर कोणालाही प्रश्नचिन्ह लावण्याचे धाडस होणार नाही, असे पंतप्रधानांनी म्हटले.



मी त्यांच्या राजकारणाचा पर्दाफाश केला


परवा राजस्थानमध्ये पंतप्रधानांनी देशासमोर काही गोष्टींच सत्य ठेवलं होतं, त्यामुळे काँग्रेस व इंडी आघाडीत सर्वत्र खळबळ उडाली होती. काँग्रेस तुमची संपत्ती हिसकावून त्यांच्या खास लोकांना वाटून देण्याचं षडयंत्र रचत होते. मोदींनी काँग्रेसच्या या राजकारणाचा पर्दाफाश केल्याने काँग्रेसने त्यांच्यासाठी अपशब्द वापरले होते. काँग्रेस सत्याला इतके का घाबरतात? ते त्यांचे धोरण इतके का लपवतात, त्यांनीच बनवलेली पॉलिसी स्वीकारण्यास ते का घाबरतात? हिंमत असेल तर स्वीकारा, आम्ही तुमच्याशी लढायला तयार आहोत, असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.


Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे