Pune Crime : पुण्यात नेमकं चाललंय काय? सलग चौथ्या दिवशी गोळीबाराने येरवडा हादरलं!

Share

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Pune Crime) प्रचंड वाढ झाली आहे. पुण्यात शिकत असलेल्या तरुणांवर एकतर्फी प्रेमातून कोयता हल्ल्याच्या घटना किंवा पुण्यात सक्रिय असलेली कोयता गँग यामुळे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढीस लागलं आहे. त्यातच एक धक्कादायक घटना पुण्याच्या येरवडा भागात घडली आहे. पुण्यात सलग चौथ्या दिवशी येरवडा परिसरात पहाटेच्या वेळी गोळीबाराची घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भयंकर भीतीचं वातावरण पसरलं आहे.

येरवडा येथील अग्रेसन स्कूल समोर पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान गोळीबाराची घटना घडली. जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. आकाश चंदाले याने विकी चंदाले या दोघांवर गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे.

सलग चौथ्या दिवशी गोळीबार

पुण्यात याआधी जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. जंगली महाराज रोडवर धीरज दिनेशचंद्र आरगडे बांधकाम व्यावसायिकावर स्विगीचे वस्त्र परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. तर हडपसरमधील शेवाळेवाडी येथे ठेकेदारीच्या वादातून दोन सैनिकांमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झाला. यापूर्वी देखील सतत पुण्यात अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना लागोपाठ घडत असल्यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Recent Posts

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले जखमी

मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय…

57 mins ago

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

9 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

10 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

10 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

10 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

11 hours ago