Jyoti Amge : नागपुरात दोन फुटांच्या महिलेने केले मतदान!

  97

व्हिडीओ पोस्ट करत नागरिकांना केलं मतदानाचं आवाहन 


मुंबई : देशभरात आजपासून मतदानाचा (Voting) पहिला टप्पा सुरु झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रात विदर्भातील (Vidarbha) रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांत मतदान होत आहे. तर देशातील १०२ जागांवर आज मतदान पार पडणार आहे. यात दोन फूट उंची असलेल्या ज्योती आमगे (Jyoti Amge) हिने नागपूर (Nagpur) येथे मतदान केले आहे. बोटावर शाई असलेला हात उंचावत तिने मतदान केल्याचा फोटो पोस्ट केला आहे. यातून तिने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


ज्योती ही जगातील सर्वात कमी उंचीची महिला आहे. तिचे सोशल मीडियावर १.६ मिलीयनहून अधिक फॉलोवर्स आहेत. सध्या ती ३० वर्षांची आहे. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटोज टाकत असते. 'नागपूर टुडे' या चॅनलने ज्योतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे असं आवाहन करताना दिसते. ज्योतीसोबत तिच्या कुटुंबियांनी देखील मतदान केले.





काय आहे ज्योतीची कहाणी?


नागपूरमध्ये जन्मलेल्या ज्योती किसनजी आमगे हिची जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद आहे. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत ती सरासरी उंचीची होत्या. त्यानंतर तिला ॲकॉन्ड्रोप्लासिया नावाचा आजार झाला. ज्यामुळे एका विशिष्ट उंचीच्या पुढे तिची उंची वाढली नाही.


ज्योती २००९ मध्ये जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आली, जेव्हा ती फ्युजी टिव्हीच्या एक कार्यक्रमात दिसली. त्यानंतर ती त्याच वर्षी मिका सिंगच्या एका गाण्यासाठी व्हिडिओमध्ये दिसली. तिने चॅनलचार डॉक्युमेंट्री बॉडीशॉकमध्ये ती दिसली. या शोमध्ये डॉक्टरांनी तिची उंची मोजली असता, ती फक्त ६१.९५ सेंटीमीटर म्हणजेच सुमारे दोन फूट उंचीची असल्याचे आढळून आले, ज्यामुळे तिला सर्वात लहान जगातील सर्वात लहान महिला म्हणून मान्यता मिळाली. उल्लेखनीय म्हणजे तिचे वजन फक्त पाच ते साडेपाच किलो होते.


ज्योती ऑगस्ट २०१४ मध्ये “अमेरिकन हॉरर स्टोरी: फ्रीक शो” च्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. २०१८ मध्ये इजिप्तच्या गिझा शहरातील पिरॅमिड्ससमोर,आठ फूट आणि नऊ इंच उंच असलेल्या तुर्कीतील सुलतान कोसेन या जगातील सर्वात उंच पुरुषासोबत उभी दिसली होती. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी इजिप्शियन टुरिझम प्रमोशन बोर्डाने या दोघांना इजिप्तमध्ये आमंत्रित केले होते. तिचा स्वतःचा पुतळा लोणावळा (पुणे) येथील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये आहे.

Comments
Add Comment

सायन पनवेल महामार्ग स्वच्छता मोहीम यशस्वी, 3500 हून श्रीसदस्यांचा सहभाग

नवी मुंबई : स्वच्छ मुंबई शुद्ध मुंबई या संकल्पनेतून नवी मुंबईकरांनी सायन - पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहिम

आई एकविरा मंदिरात भाविकांना सात जुलैपासून ड्रेस कोड, तोकडे कपडे घालून आल्यास मंदिरात प्रवेश नाही

पिंपरी-चिंचवड : कोळी बांधवांची आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला

Pratap Sarnaik : इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा

ठाणे : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात (E-tractor agriculter sector) क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन

बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी - एनडी स्टुडिओ मार्फत साकारणार कलाप्रकल्प, मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुभारंभ...

मुंबई : महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी (Maharashtra Dadasaheb Phalke Cinema) बेळगाव येथील "बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये (Belgaum Smart City)

Municipal school : ठाण्यात फक्त ३८ मराठी शाळांना मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम...

ठाणे :  गेला अनेक वर्षांपासून पालिका शाळेत मख्याध्यापकांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पालिकेतील शाळेत

अजित पवारांच्या मुलापाठोपाठ पुतण्याचाही साखपुडा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी झाला. आता अजित पवारांचा