मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची निवडणूक शुक्रवारी पार पडली आहे. काही घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले आहे. २१ राज्य आणि केंद्र शासित प्रशांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पड़ले आहे. यापैकी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदान नोंदविले गेले आहे. या मतदारसंघांमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान घेण्यात येत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंतचे मतदान टक्केवारी आली आहे. देशात ५९.७१ टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रात पाच लोकसभा मतदारसंघात ५४. ८५% मतदान झाले.
सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले असून ७७.५७% मतदान झाले आहे. दुसरा क्रमांक त्रिपुरा राज्याचा असून ७६.१०% मतदान झाले आहे. मेघालय ६९.९१%, मध्य प्रदेश ६३.२५%, तामिळनाडू ६२.०८%, उत्तर प्रदेश ५७.५४%, बिहार ४६.३२%, उत्तराखंड ५३.५६%, जम्मू-कश्मीर ६५.०८%, राजस्थान ५०.२७%, छत्तीसगड ६३.४१%, आसाम ७०.७७%, पाँडिचेरी ७२.८४%, अरुणाचल प्रदेश ६४.०७%, नागालँड ५६.१८%,मिझोरम ५३.९६%, सिक्किम ६८.०६%, मणिपूर ६८.६२%, अंदमान निकोबार ५६.८७%, लक्षद्वीप ५९.०२%, महाराष्ट्र ५४.८५% एवढे मतदान झाले आहे.
सर्वात कमी मतदान हे बिहारमध्ये झालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जास्त मतदान झाले तर सत्ताधाऱ्यांविरोधात मत गेल्याचे जाणकार सांगतात. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये जास्त मतदान झाले होते. परंतु भाजपाचे सरकार पुन्हा आले होते. तर २००९ पेक्षा २०१४ मध्ये जास्त मतदान झाले होते. तेव्हा सत्तांतर झाले होते. यामुळे हे कमी झालेले मतदान कोणाच्या फायद्याचे हे ४ जुलैलाच समजणार आहे.
रामटेक ५२.३८ टक्के
नागपूर ४७.९१ टक्के
भंडारा- गोंदिया ५६.८७ टक्के
गडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्के
आणि चंद्रपूर ५५.११ टक्के
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…