जागतिक हेरीटेजदिनी जंजिरा किल्यात विनामुल्य प्रवेश

पर्यटकवाढीसाठी पुरातत्व विभागाचा स्तुत्य उपक्रम


मुरूड : जागतिक हेरीटेज दिवस (World Heritage Day) १८ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जंजिरा किल्ला (Janjira Fort) पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पुरातत्व विभागातर्फे प्रवेश मोफत दिला जातो. पर्यटक वाढीसाठी व पर्यटकांना गड, दुर्ग किल्ल्यांची ओळख व्हावी यासाठी पुरातत्व विभागातर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो.


पृथ्वीवरील सांस्कृतिक वारसा आणि विविधता यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १८ एप्रिल या दिवशी, 'वर्ल्ड हेरिटेज डे' म्हणजेच जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा युनेस्कोद्वारे [UNESCO] साजरा केला होता.


लोकांना तसेच स्थानिक नागरिकांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे, विविध स्मारकांच्या जतनाचे महत्त्व समजण्यासाठी आणि ते जपण्यास प्रेरणा देणे असा या दिवसाचा हेतू आहे.



१९८३ सालापासून स्मारके आणि साइट्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेने थीम ठेवण्यास सुरुवात केली. त्या थीमनुसार हा दिवस साजरा केला जातो. यंदा वर्ष २०२४ ची थीम ही 'व्हेनिस चार्टरच्या दृष्टीतून आपत्ती आणि संघर्ष' [Disasters & Conflicts Through the Lens of the Venice Charter] अशी ठेवण्यात आली आहे.


मुरूड -राजपुरी येथील ऐतिहासिक नबाबकालिन प्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. किल्ले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या प्रकारे ओळख व्हावी व त्याचे महत्त्व समजावे म्हणून पुरातत्व विभागातर्फे हा दिवस जागतिक हेरीटेज डे म्हणून साजरा करण्यात येत असतो. या दिवशी जंजिरा किल्ला प्रवेश निःशुल्क ठेवण्यात आले आहे.


Comments
Add Comment

शॉर्ट सर्किटमुळे ‘समृद्धी’वर खासगी बसला अपघात

३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर

अमेरिकन व्हिसा पाहिजे, तर साडेतेरा लाख जमा करा !

व्हिसा नाकारला गेला तर पैसे परत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्हिसासाठी काही देशांतील नागरिकांना अर्ज

पुणे : कोथरुडमध्ये उबाठा उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग

पुण्यात हायव्होल्टेज सामना; आंदेकर कुटुंबाकडे किती मालमत्ता? प्रतिज्ञापत्रातून खुलासा

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक २३ मध्ये जोरदार सामना पहायला मिळणार

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

मुलीचे नाव घेऊन बोलावले आणि काटा काढला

पुणे : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलाचे नाव अमरसिंह गचांड असून,