MNS Vs Thackeray : कधीही राजकीय भूमिका न बदलल्याबद्दल तुमचा दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळावा

मनसे नेत्याचं उद्धव ठाकरेंना बोचरं पत्र


शिल्लक सेना प्रमुख असा टोला लगावत पत्रात उद्धव ठाकरेंच्या स्वार्थी राजकारणाचा केला उल्लेख


मुंबई : लोकसभेसाठी (Loksabha) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आजवर केलेल्या विकासकामांमुळे आपण हा पाठिंबा देत असल्याचे म्हटले. त्यांच्या या भूमिकेनंतर उबाठा गटाने (Thackeray Group) त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. 'राज ठाकरे सातत्याने भूमिका बदलतात', अशी टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे. यावर आता मनसे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी उद्धव ठाकरेंना पत्रातून जबरदस्त टोले लगावले आहेत. 'कधीही राजकीय भूमिका न बदलल्याबद्दल तुमचा दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळावा', असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत बदललेल्या राजकीय भूमिकांचा पाढाच या पत्रात वाचला आहे.


गजानन काळे यांनी हे पत्र आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केले आहे. हे पत्र जसंच्या तसं वाचा...
प्रति,
आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे,
शिल्लक सेना प्रमुख (उबाठा),
मुंबई.


विषय - कधीही आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल न केल्याबद्दल आपला दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळणेबाबत ...


महोदय,
सस्नेह जय महाराष्ट्र !!!


आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे आपण शिवसेनेची धुरा हातात घेतल्यापासून (माफ करा आत्ताचा आपला उबाठा गट) कधीही सेनेच्या भूमिकेला छेद देऊन राजकारण केलेले नाही. मंत्रीपद, सत्ता, मुख्यमंत्री पद (स्वतःला) यासाठी आपण कधी भाजपा बरोबर युती केली तर कधी युती तोडली. नंतर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आपण सेनेचे पारंपरिक शत्रू असलेले आणि संपूर्णतः विरोधी विचारधारा असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (म्हणजे आत्ताचा शरद पवार गट) बरोबर आघाडी केलीत मात्र सेनेला मुख्यमंत्री पद मिळवून दिलेच. हा भाग वेगळा की आपण एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतात पण माफ करा आम्ही विसरलोच की आपणही एक शिवसैनिकच आहात. हे सगळे आपण केलेत यास कुठेही *यू टर्न, तडजोडीचे, सत्तापिपासू, स्वार्थी, मतलबी राजकारण अथवा भूमिका बदलणे* असे म्हणता येत नाही. याबद्दल आपले करावे तितके कौतुक कमीच आहे...!!!


आपल्यासारखा इतका सच्चा, प्रामाणिक, तत्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा आणि सत्तेचा अजिबात मोह नसलेला व्यक्ती आजच्या राजकारणातच काय तर या पृथ्वीतलावर सापडणे दुर्मिळ. याच आपल्या गुणांसाठी, तुमचे महाराष्ट्रावर असेलेले ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्राच्यावतीने आपला *दुधाने अभिषेक* करू इच्छितो (जसा नायक सिनेमात अनिल कपूर यांचा केला गेला होता) तरी आपण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना यासाठी आपली वेळ द्यावी,
ही नम्र विनंती...!!!


आपला नम्र,
गजानन काळे,
महाराष्ट्र सैनिक


टीप - निवडणुकांच्या आपल्या व्यस्त दिनक्रमात आपण वेळ न देऊ शकल्यास आपल्या फोटोला आम्ही दुधाने अभिषेक घालून समस्त महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करुच...!!!





उबाठा सेनेला चपराक


ठाकरे भावंडांमधील वाद सर्वश्रुत आहे. त्यातच राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. मात्र, ज्या गोष्टीवरुन उबाठा टीका करत होती नेमकी तीच गोष्ट पकडून गजानन काळे यांनी या पत्रातून उबाठा सेनेला चपराक लगावली आहे. येत्या काळात आणखी काय उलथापालथी घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी