Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात! भरधाव बस पलटली

Share

१५ ते २० जण जखमी तर एकाची प्रकृती गंभीर

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खासगी ट्रॅव्हल बस पुण्याहून नाशिकच्या दिशेने येत असताना पहाटे ६ च्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी तर एक प्रवासी गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सिन्नर-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाला. ती बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली आहे. ट्रॅव्हल बस पुण्याहून नाशिकच्या दिशेने येत असताना समृद्धी महामार्गावरील ‘इंटरचेंज’ पॉइंटजवळ हा अपघात झाला. अपघातात १५ ते २० जण जखमी झाल्याचे वावी पोलिसांनी सांगितले. त्यापैकी चार-पाच प्रवाशी गंभीर जखमी आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे

वावी पोलिस व महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा सुरू आहे. तर जखमींना सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

1 hour ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

1 hour ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

1 hour ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

1 hour ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

1 hour ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

1 hour ago