Shivsena song : 'कणखर बाणा... हाती भगवा... आणि धनुष्यबाण!' शिवसेनेचे नवे प्रचारगीत प्रसिद्ध

गाण्याची सुरुवात बाळासाहेबांपासून, मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन ते मोदीजींची गॅरंटी


मुंबई : "मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूँगा... कभी नहीं!" हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांच्या तोंडून हे उद्गार निघतात आणि शिवसेनेचं नवे प्रचारगीत सुरु होतं. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं नवं गीत (Shivsena new campaign song) प्रदर्शित झालं आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी व महायुतीने (Mahayuti) केलेली विकासकामे दाखवण्यासोबतच उबाठा गटावर (Thackeray Group) टीका करण्यात आली आहे. युट्यूबवर या गाणं सध्या व्हायरल होत असून अनेक जणांनी यावर सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.


'कणखर बाणा... हाती भगवा... आणि धनुष्यबाण!' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यामध्ये बाळासाहेबांचं "मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूँगा!" हे वाक्य वारंवार ऐकू येतं. यातून शिवसेनेने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या 'ही बाळासाहेबांच्या विचारांवर आधारलेली, त्यांचे विचार पुढे नेणारी शिवसेना आहे', या भूमिकेचा गाण्यातून पुनर्रुच्चार केला जातो. गाण्याच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन देण्यात आले आहे.



साडे तीन मिनिटांच्या या गाण्यात नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं दिसतात. तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतर विविध विकास कामांच्या उदघाटनाचे व्हिडिओही दिसतात. व्हिडिओच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही छोटीशी झलक दिसते. “भारताला समृद्ध आणि विकसित बनवायचे आहे”, असे पंतप्रधान मोदी सांगताना दिसतात. शिवसेनेच्या जुन्या प्रचारगीताप्रमाणे हे गाणं नवी ओळख निर्माण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास