Dead Sea: काय सांगता? कितीही प्रयत्न केले तरीही 'या' समुद्रात बुडणार नाही!

जाणून घ्या कुठे आहे 'हा' रहस्यमय समुद्र?


जेरुसलेम : पृथ्वीवरील अनेक ठिकाणं पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो तर काही गोष्टी अशा आहेत ज्यावर लोकांचा विश्वास बसत नाही. त्यापैकीच पृथ्वीवर एक असा रहस्यमयी समुद्र आहे, ज्यात तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी बुडणार नाही. तसेच या समुद्राच्या परिसरातील सुंदर दृश्ये तुम्हाला भुरळ घालतील, कोणते ठिकाण आहे हे? जाणून घ्या..


पृथ्वीवर अनेक आश्चर्यकारक ठिकाणे आहेत आणि असेच एक ठिकाण म्हणजे इस्रायल आणि जॉर्डनच्या दरम्यान असलेला मृत समुद्र (Dead Sea). हे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथील पाणी इतर समुद्राच्या पाण्यापेक्षा १० पट जास्त खारट आहे, ज्यामुळे हा समुद्र इतर जलाशयांपेक्षा खूप वेगळा आहे. या समुद्रातील पाण्यात अधिक प्रमाणात मीठ असल्यामुळे कोणताही प्राणी किंवा वनस्पती जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे या समुद्राला 'मृत समुद्र' असे नाव देण्यात आले.


मृत समुद्र त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय आहे. मृत समुद्रातील विशेष बाब म्हणजे त्यात कोणीही बुडू शकत नाही. याच्या पाण्यात मिठाचे प्रमाण इतके जास्त आहे की तुम्ही त्यात झोपले तरी बुडणार नाही. एका बाजूला इस्रायलने वेढलेला मृत समुद्र, तर दुसऱ्या बाजूला जॉर्डनच्या सुंदर टेकड्या आणि वेस्ट बँक हे दृश्य अतिशय सुंदर आहे.


इस्रायलमधील या समुद्राचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येतात. समुद्राच्या चिखलात हायलुरोनिक ऍसिड आणि त्वचेसाठी फायदेशीर अशी अनेक खनिजे आहेत. येथे येणारे लोक अंगावर मातीची पेस्ट लावून सूर्यस्नान करतात. समुद्रातील औषधी गुणधर्मांचा लाभ घेण्यासाठी आणि कधीच बुडू शकणार नाही यासाठी लाखो पर्यटकांची गर्दी येथे पाहायला मिळते.

Comments
Add Comment

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या