यवतमाळ : राज्यात सगळीकडे उन्हाच्या झळा बसत असताना विदर्भामध्ये (Vidarbha) मात्र उलट परिस्थिती आहे. या ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळ पासून वादळीवार्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. काल पहाटे व संध्याकाळीही या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. तर यवतमाळ नजीक शेतात वीज कोसळल्याने बैलजोडी ठार झाली.
यवतमाळच्या अनेक भागात वादळी पाऊस व गारपीटीमुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. आर्णी ते सावळी रोडवर असलेल्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर महिलेचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. सिंधू सुभाष राठोड (४०, रा. अंतरगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेत धम्मपाल विष्णू भगत (४०), कल्पना धम्मपाल भगत (३५) आणि हर्षद धम्मपाल भगत (९) सर्व रा. डोळंबा हे तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान यवतमाळ नजीक बरबडा शिवारात वीज कोसळून प्यारेलाल पातालबंसी यांची बैलजोडी ठार झाली.
अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अडीचशेच्या वर गावांतील दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. केळापूर तालुक्यात सर्वाधिक ७८० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. आंबा, टरबूज, खरबूज, गहू, तीळ, मका, भुईमूग आदी पिकांसह भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले. बाभूळगाव शहरात वादळी पावसाने अनेक घरांवरील छप्पर उडाले. तर तालुक्यात ५४४ घरांची पडझड झाली. जिल्ह्यात आतपर्यंत ५८० घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडे आली आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात १५.९ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली.
आज गुरूवारी सकाळपासूनच ढगाळी वातावरण असून सोसाट्याचे वारे वाहत आहेत. त्यामुळे आज संध्याकाळी देखील जिल्ह्यास वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…