Narayan Rane : बाळासाहेबांचा ज्यांना विरोध त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंचा घरोबा!

ज्या कोकणी माणसामुळे शिवसेना फोफावली त्याच्याकडेच उद्धव ठाकरेंचं दुर्लक्ष


विनायक राऊतने १० वर्षांत काय केलं? त्याच्या घरी जाणारा रस्तादेखील माझ्या विकास निधीतला


केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा हल्लाबोल


सिंधुदुर्ग : सध्या देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेते (Political Leaders) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. मात्र, ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी करत असलेल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरतात आणि भाजप नेते त्यांना कायम टार्गेट करतात. त्यातच आज केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी कणकवली शहर महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उबाठाचा चांगलाच समाचार घेतला. 'बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम विरोध केला, त्याच काँग्रेस आणि शरद पवारांसोबत आज उद्धव ठाकरेंनी घरोबा केला', अशी नारायण राणे यांनी सडकून टीका केली.


केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, कणकवली शहरातील ९०% टक्के मतदान महायुतीला हवे आहे. कणकवली हे जिल्ह्याचे मध्यवर्ती आणि व्यापाराचे केंद्र आहे. विनायक राऊत (Vinayak Raut) भाजपच्या जीवावर खासदार झाले. स्व. बाळासाहेबांनी कायम काँग्रेसला विरोध केला. आज उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांसोबत घरोबा केला, अशी सणसणीत टीका नारायण राणे यांनी केली. पुढे ते म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीत उबाठाचा एकही खासदार निवडून येणार नाही. विरोधकांकडे नेतृत्व शिल्लक नाही. भाजपचे ३७० आणि एनडीएचे मिळून चारसौ पार हा पंतप्रधान मोदी यांचा नारा आहे. मोदी जे बोलतात ते करून दाखवतात, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



ज्या कोकणी माणसामुळे शिवसेना फोफावली त्याच्याकडेच दुर्लक्ष


२०१४ साली जागतिक अर्थव्यवस्थेत १४ व्या क्रमांकावर असलेला भारत मोदी यांनी जगात ५ व्या क्रमांकावर आणला आहे. येत्या काळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मोदी करणार आहेत. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मोदी सरकारने विशेष उपक्रम राबवले. मोदींनी ८० कोटी जनतेला मोफत धान्य सुरू ठेवले आहे. खासदार म्हणून विनायक राऊत ने मागील १० वर्षांत काय आणले ? विकासकामांत अपयशी ठरलेल्या विनायक राऊतला घरी बसवण्याची वेळ आता आली आहे. विनायक राऊतने स्वतःच्या तळगाव गावातील घराकडे जाणारा रस्ता माझ्या विकास निधीतून केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत कोकणासाठी काय दिले? रोजगार, आरोग्य दळणवळण सिंचन साठी काय केले? कोकणी माणसामुळे शिवसेना फोफावली. पण त्याच कोकणी माणसाकडे शिवसेनेने दुर्लक्ष केले, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.



माझ्या राजकीय वाटचालीत कणकवलीकरांचा फार मोठा वाटा


माझी कोकणच्या विकासाशी कमिटमेंट आहे. कोकणात रोजगार आणि व्यावसायिक शिक्षण यावरच माझा भर आहे. रोजगार मिळावा म्हणून दोडामार्ग मध्ये १ हजार एकरवर ५०० कारखाने आणण्याचा माझा मानस आहे. शुभकार्याला जाताना जसे देवाच्या पाया पडतो तसाच आता लोकसभेला सामोरे जायचंय तर आधी कणकवलीकरांना सामोरा जातोय, नमस्कार करतो अशी भावनिक साद केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी घातली. तर राजकारणात १९९० पासून कणकवलीकरांनी मला भरभरून प्रेम दिले. माझ्या राजकीय वाटचालीत कणकवलीकरांचा फार मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, ओरोस येथे टेक्निकल सेंटर सुरू केले आहे. फुट प्रोसेसिंग मशीन आणि इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण तेथे देण्यात येणार आहे. ट्रेनिंग घेतलेल्या मुलांना देशात परदेशात नोकरी मिळेल. यावेळी आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेविका राजश्री धुमाळे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना