PM Narendra Modi: 'रामनवमी जवळ येत आहे, पाप करणाऱ्यांना विसरू नका'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर घणाघात


पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendrta modi) विविध राज्यांत मॅरेथॉन सभा घेत आहेत. आज बिहारच्या नवादा येथे जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले. मोदी यांनी दिलेली आश्वासनं बेकायदेशीर आहेत अशा विरोधकांच्या आरोपावर इंडिया आघाडीच्या नेत्यांचा संदर्भ देत, 'माझी नियत साफ आहे आणि दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची ताकद माझ्यात आहे' असे नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.


जानेवारी महिन्यात अयोध्येत बांधलेल्या श्रीराम मंदिराचा (Ayodhya Ram mandir) भव्य सोहळा झाला. त्या सोहळ्यात अनेक पक्षांनी पाठ फिरवली होती. श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जाईल असे दिलेले आश्वासन पंतप्रधानांनी पूर्ण केले आहे. मंदिराचे काम थांबण्यासाठी काँग्रेस आणि राजदने वर्षानुवर्षे प्रयत्न केले. मात्र तरीही राममंदिराचे काम पूर्ण झालेच. 'रामनवमी जवळ येत आहे, पाप करणाऱ्यांना विसरू नका. मोदींच्या गॅरंटीमुळेच त्यांची दुकाने बंद होत आहेत, हे त्यांना माहित असल्यामुळेच ते लोक मोदींच्या गॅरंटीला विरोध करत आहेत', असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला.



इंडिया आघाडी म्हणजे देशद्रोही शक्तीचे घर


इंडिया आघाडीचे लोक भारताचे विभाजन करण्याची भाषा बोलतात. काँग्रेस आणि आरजेडीला एकही मत मिळण्याचा अधिकार नाही. या लोकांना सत्तेचे व्यसन लागले आहे. सत्तेतून बाहेर पडताच ते पाण्यातल्या माशाप्रमाणे तडफड करतात, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.


Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा