Eknath Shinde: मी डॅाक्टर नसलो तरी काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले!

  94

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला


नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नागपूर दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी नागपूर येथील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद साधला. त्यावेळी, "राजू पारवे यांच्यासाठी डॅाक्टरांनी सहकार्य केलं. मी कोरोना काळात डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हा त्यांना धीर दिला. कोरोना काळात डॉक्टरांनी देवदुताप्रमाणे काम केलं. मी डॅाक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले", असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.


एकनाथ शिंदे म्हणाले, खासदार कृपाल तुमाने यांना खासदारापेक्षा मोठा मान देणार आहे. लोकांना मदत करताना कधी कधी डॉक्टरांना पैसे कमी करायला सांगावे लागले. डॉक्टर संघटनेच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी कृपाल तुमाने यांचे तोंड भरून कौतुक केलं. दोन वेळा खासदार होऊन दिल्लीत गेलेल्या तुमाने यांना यावेळी निवडणूक लढवायची नाही असे एकनाथ शिंदेंच्या सांगण्याप्रमाणे ते तयारही झाले.



डॉक्टर हा समाजाचा आधारस्तंभ


डॉक्टर हा समाजाचा आधारस्तंभ आहे. जीवनदान देणारे परमेश्वराचे रुप म्हणजे डॉक्टर आहेत. कोणताही डॉक्टर पेशंट आपल्या घरी सुखरुप जावा, यासाठी प्रयत्न करत असतो. पैसे कमी करायला सांगितले तर डॉक्टर आवडीने करतो. कारण त्यांना माहिती आहे, हे खिशातून पैसे देतील. कोविडमध्ये अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला. डॉक्टर देण्याच्या अगोदर पेशंटच म्हणायचा रेमेडेसिवीर द्या. मी कोरोना काळात खूप फिरलो. मी थोडे दिवस आरोग्यमंत्री होतो, तेव्हा दुर्गम भागात गेलो. प्रत्येक ठिकाणी भेट दिली. तिथेही डॉक्टर लोक चांगलं काम करतात. ऑर्थोपिडिक सर्जन खूप आहेत, असही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.


Comments
Add Comment

राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, रायगडला रेड अलर्ट, पुण्यात ऑरेंज अलर्ट

मुंबई : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार काही भागात पावसाने

हिंदवी पाटीलला अश्रू अनावर; सह्याद्री अमृततुल्यावर PMC ची कारवाई!

पुणे : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा हिंदवी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण काहीसे दुःखद आहे.

प्रवेश घ्या आणि कॉपी करून पास व्हा!

मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावर कॉपी प्रकरण; चौकशीत ३२ विद्यार्थी निलंबित यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी

Palki Sohala : देहू-आळंदीत वारीच्या सोहळ्याची लगबग सुरु!

बुधवारी तुकोबा, गुरुवारी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील वारकऱ्यांना ओढ लागते

Ajit Pawar : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- अजित पवार

पुणे : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी

Pune News : सावधान! पुण्यात जलजन्य आजारांचा धोका

कडक उन्हापासून दिलासा देणारा पावसाळा ऋतू. मात्र यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस धुमाकूळ घालतोय. पुण्यात या