मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी आणि काही अभियांत्रिकी कामे मार्गी लावण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेने रविवार ७ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेतला आहे. यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव दरम्यान मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.
ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत सदर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी रविवार ७ एप्रिल रोजी अप आणि डाऊन हार्बर मार्गांवर माहीम आणि अंधेरी दरम्यान ११ ते १६ वाजेपर्यंत जंबो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधी दरम्यान, मध्य रेल्वेच्या सर्व सीएसएमटी – वांद्रे – सीएसएमटी आणि सीएसएमटी – गोरेगाव – सीएसएमटी हार्बर मार्गावरील सेवा आणि चर्चगेट ते गोरेगाव दरम्यान काही धीम्या मार्गावरील सेवा रद्द राहतील.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…