भाजपा नेते नितीन गडकरींचे मविआच्या आरोपांना प्रत्युत्तर
नागपुर : भ्रष्ट्राचारी नेत्यांना पक्षात घेतले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाचे नेते कायमच सत्ताधारी भाजपावर करत असतात. या आरोपाला भाजपा नेते नितीन गडकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात भाजपावर नेहमी वॉशिंग मशीन असल्याचा आरोप केला जात होता, तर उलट खरी वॉशिंग मशीन, तर शरद पवार यांच्याकडे असल्याचा प्रतिहल्ला नितीन गडकरी यांनी केला आहे. त्यांनी आजपर्यंत आयुष्यात विविध पक्षांतील अनेक नेत्यांना स्वीकारले असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. इतकेच नाही, तर वसंतदादा पाटील यांच्यापासून आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंतचा इतिहास सांगत, गडकरी यांनी शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीवर टीका केली आहे.
भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांची प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुलाखत घेतली आहे. या दरम्यान गडकरी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली. या मुलाखतीत गडकरी यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला. पवार यांनी आयुष्यभर विविध पक्षांतील लोकांना स्वीकारले असल्याचा आरोप गडकरी यांनी केला आहे.
नवे साथीदार, नवनवीन पक्ष
‘वॉशिंग मशीन, तर शरद पवार यांच्याकडे आहे. आयुष्यभर त्यांनी विविध पक्षांतील लोकांना स्वीकारले. मुख्य म्हणजे त्यांनी लोकांना एकत्र आणले आणि तोडले. पहिले वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते ते मंत्री होते.
सरकार सूडबुद्धीची कारवाई करत नाही
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याविषयी देखील गडकरी यांनी निर्णयाचे समर्थन केले आहे. प्रफुल्ल पटेल हे दोषी नव्हते, त्यामुळे त्यांना क्लीन चिट मिळाली. त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर सक्तीची कारवाई करायची का? अहवाल आणि तपासाच्या आधारे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असल्याचे गडकरी म्हणाले. पैसे कसे मिळाले हे तुम्ही झारखंडमध्ये पाहिले आहेत. कारवाई करताना एजन्सींनी कोणावर अन्याय केल्यास ते न्यायालयात जाऊ शकतात. आमचे सरकार सूडबुद्धीची कारवाई करत नसल्याचा दावा गडकरी यांनी केला आहे.