Gadchiroli Maoist Camp : छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

Share

माओवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त करत सर्व साहित्य केले जप्त

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) वेगवान कारवाई करत गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्प शुक्रवार (ता. २९) उद्ध्वस्त केला.

कसनसूर-चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड- महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ उप पोलिस स्टेशन पेंढरीपासून १२ किमी पूर्वेला तळ ठोकून असल्याची विश्वासार्ह माहिती शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाच्या जवानांद्वारे जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. अभियान पथक शनिवारी सकाळी ४५० मीटर उंच टेकडीवर पोहोचले. त्यावेळी माओवादी नुकतेच या ठिकाणहून निघाले होते. डोंगरमाथ्यावरील ठिकाणावर शोधमोहीम राबविली असता त्याठिकाणी माओवाद्यांचे एक मोठे आश्रयस्थान आणि छावणी सापडली. तो कॅम्प अभियान पथकाद्वारे नष्ट करण्यात आला. जंगल परिसरात पुढील शोध सुरू करण्यात आला. परंतु अत्यंत खडतर प्रदेश आणि पर्वतांचा फायदा घेत माओवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

यावेळी घटनास्थळावरून कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन स्टिक्स, बॅटरी, वॉकीटॉकी चार्जर, बॅकपॅक आदींसह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. विशेष अभियान पथकाची सर्व पथके रविवार (ता. ३१) गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहे. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.

Recent Posts

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

10 minutes ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

10 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

1 hour ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago