Sunday, March 23, 2025
HomeदेशBharatratna Award : लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ प्रदान

Bharatratna Award : लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवासस्थानी जाऊन केला सन्मान

नवी दिल्ली : देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना रविवारी ‘भारतरत्न’ पुरस्काराने (Bharatratna Award) सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी अडवाणींच्या घरी जाऊन त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे संस्थापक सदस्य नानाजी देशमुख यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे ते भाजप आणि आरएसएसशी संबंधित असलेले तिसरे नेते आहेत.

राष्ट्रपती भवनात काल आयोजित कार्यक्रमात चार दिग्गजांना मरणोत्तर भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि कृषी क्षेत्रातील संशोधक एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -