Devendra Fadnavis: अंतर्गत वादाचा विजयात अडथळा नको; देवेंद्र फडणवीसांचा महायुतीच्या नेत्यांना निर्देश...

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. तर दुसरीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांच्या विरोधात राम शिंदे यांनी भूमिका घेतल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील वाद पक्ष पातळीवर सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे वाद मिटवण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. मात्र, तरी वाद मिटताना दिसत नसल्याचे पाहून अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचे काम करा, अंतर्गत मतभेदाचा परिणाम ‘मिशन ४५’ प्लस वर होता कामा नये, असे निर्देश भाजपा नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


बारामती लोकसभा मतदारसंघात एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात थेट आघाडी उघडली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महायुतीवर होत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या संदर्भातच चर्चा सुरू असताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज आहेत. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांची एकत्र बैठक घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांमधील वाद कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या बैठकीनंतरही हर्षवर्धन पाटील यांचे समाधान झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या विषयी कोणतेही मत मांडण्यास हर्षवर्धन पाटील यांनी नकार दिला आहे. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. मात्र, तरीही वाद मिटला की नाही, याबाबत माहिती समोर आलेली नाही.


अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघांमध्ये राम शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी महायुतीचा उमेदवार विजयी होईल, बाकी सर्व बाजूला ठेवा, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात संकेत दिले आहेत. अंतर्गत वादामुळे महायुतीच्या उमेदवारास परिणाम होता कामा नये, अशी समज देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नेत्यांना दिली आहे.


Comments
Add Comment

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Dhule Crime News : “अपमान सहन झाला नाही”; संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या

धुळे : धुळ्यातील एका कुटुंबात बहिणीच्या लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच काही तासांतच अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक

Accident : मिसिंग लिंकवर तीन तासांत दोन अपघात, मुंबई - पुणे वाहतूक विस्कळीत

पुणे : मुंबई ते पुणे प्रवास हा प्रवास वेगाने करण्यासाठी मिसिंग लिंक सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे प्रवास

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पालखी महामार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा

सोलापूर : सोलापूर जिल्हा (Solapur News) हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा गाभारा मानला जातो. येथे श्री विठ्ठल